सहा हजार कोटी ते २४ लाख कोटी ! (भाग-२)

म्युच्युअल फंड क्षेत्राची ५५ वर्षांची लक्षणीय वाटचाल

१९६३ साली भारतात सरकारच्या पुढाकारने सुरु झालेला पहिला म्युच्युअल फंड म्हणजे युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया. भारत सरकार व रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांनी पुढाकार घेऊन या म्युच्युअल फंड कंपनीची मुहुर्तमेढ रोवली. म्युच्युअल फंड क्षेत्राचा इतिहास प्रामुख्याने चार विविध टप्प्यात विभागला आहे.

सहा हजार कोटी ते २४ लाख कोटी ! (भाग-१)

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

चौथा टप्पा (फेब्रुवारी २००३ ते डिसेंबर २०१८ अखेर) – फेब्रुवारी २००३ मध्ये युटीआयचा कायदा (१९६३) दोन भागात विभाजित करण्यात आला. यातील पहिला भाग जो युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया अंतर्गत हमी असलेली योजना १९६४ च्या अंतर्गत असलेली रक्कम रू. २९,८३५ कोटी २००३ अखेरीस यामध्ये खात्रीपूर्वक परतावा देण्याची हमी होती आणि याचे नियमन भारत सरकारच्या देखरेखीखाली केले जात होते.

यातील दुसरा भाग यूटीआय म्युच्युअल फंड म्हणून निर्माण करण्यात आला आणि यासाठी प्रायोजक म्हणून एसबीआय, पीएनबी, बीओबी आणि एलआयसी यांनी पुढाकार घेतला. या कंपनीची नोंदणी सेबीकडे करण्यात आली. यामुळे मार्च २००० साली युटीआयच्या अंतर्गत ७६ हजार कोटींची मालमत्ता गुंतवणुकीसाठी होती. या एकत्रीकरण व विलिनीकरणाच्या काळात अनेक म्युच्युअल फंड पुढे जाऊन एकत्रित झाले.

नोव्हेंबर २०१८ अखेरीस ४३ म्युच्युअल फंड कंपन्यांच्या अंतर्गत रू. २४.०३ लाख कोटीच्या गुंतवणुकी आजअखेर झालेल्या आहेत.

म्युच्युअल फंड गुंतवणुकीत आपल्या देशात कशी वाढ झाली, हे या प्रवासावरून स्पष्ट होते आणि त्याचा अलीकडील काही वर्षांतील प्रवास किती वेगवान आहे, हेही लक्षात येते. याचा अर्थ सुरवातीला म्युच्युअल फंडांत गुंतवणुकीला भारतीय नागरिक तयार नव्हते, पण गेली काही वर्षे त्यात सातत्याने होत असलेली वाढ लक्षणीय ठरली आहे. विशेषतः छोट्या आणि मध्यम शहरांतील गुंतवणूकदारही म्युच्युअल फंडांत गुंतवणूक करू लागल्यानेही गुंतवणूक खऱ्या अर्थाने व्यापक झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)