सहा हजार कर्णबधिरांना मोफत श्रवणयंत्र

पिरंगुट -खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रयत्नातून महाराष्ट्रातील वेगवेगळ्या 18 जिल्ह्यातील 6000 कर्णबधिर विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिक यांना मोफत श्रवणयंत्र जोडणीचा कार्यक्रम घेण्यात येणार आहे. बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे शुक्रवारी (दि. 26) सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत हा कार्यक्रम होणार असून श्रवणयंत्र वाटपाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे.
स्टार्की हिअरिंग फाऊंडेशन, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान – मुंबई, टाटा ट्रस्ट- मुंबई, पवार पब्लिक चॅरीटेबल ट्रस्ट, ठाकरसी ग्रुप, आर. व्ही. एस. एज्युकेशनल अँड चॅरिटेबल फाऊंडेशन – मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच अपंग कल्याण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य, महात्मा गांधी सेवा संघ-अपंग पुनर्वसन केंद्र पुणे यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम घेण्यात येणार आहे. बालेवाडी स्टेडिअम येथे दुपारी चार वाजता माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार, स्टार्की स्टारकी फाउंडेशनचे संस्थापक चेअरमन विल्यम ऑस्टिन, सहसंस्थापक टॅनी ऑस्टिन, खासदार सुप्रिया सुळे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, टाटा ट्रस्टचे मैनेजिंग ट्रस्टी आर. व्यंकटरमणन, राज्याचे अपंग कल्याण आयुक्त रुचेश जयवंशी, ठाकरसी ग्रूपचे राऊल ठाकरसी आदी उपस्थित राहणार आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)