सहा वर्षाच्या चिमुकलीवर 48 वर्षीय नराधमाचा अत्याचार 

लातूर (प्रतिनिधी): औसा तालुक्‍यात एका 6 वर्षीय चिमुकलीवर 48 वर्षाच्या नराधमाने अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या पालकांनी किल्लारी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. या घटनेमुळे औसा तालुक्‍यात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या बाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की या मुलीला चॉकलेटचे आमिष दाखवून आरोपी रातेंद्र छत्रे याने बोलावून घेतले आणि अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार पीडीत मुलीच्या पालकांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी किल्लारी पोलीस ठाण्यात नराधमाविरोधात तक्रार दाखल केली. पीडित मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान, पोलीस ठाण्यात तक्रार नोंद केल्याची चूणुक लागताच आरोपी राजेंद्र छत्रे हा फरार झाला आहे. किल्लारी पोलीस ठाण्यात राजेंद्र छत्रेच्या विरोधात बाललैंगिक अत्याचार कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक आरोपीचा शोध घेत आहेत. या घटनेमुळे आरोपीच्या विरोधात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)