सहा वर्षाच्या केदार साळुंखेने स्केटिंगद्वारे केला विश्वविक्रम 

3 तास 38 मिनिटात 55 किलोमीटरचे अंतर केले पार 

कोल्हापूर – कोल्हापूर मधील सहा वर्षाच्या केदार साळुंखे याने सांगली ते कोल्हापूर हे 55 किलोमीटरचे अंतर स्केटिंगच्या माध्यमातून अवघ्या 3 तास 38 मिनिटात पूर्ण करून विश्वविक्रम केला आहे. त्याच्या या कामगिरीचे कौतुक कोल्हापूर जिल्ह्यात सर्वत्र केले जात आहे. 26 नोव्हेंबर 2008 साली मुंबईतील हॉटेल ताज वर दहशतवादी हल्ला झाला होता. या घटनेला आज 10 वर्षे झाली आहेत.

-Ads-

या हल्ल्यात शहीद झालेले पोलीस अधिकारी, अन्य पोलिस व नागरिक यांना मानवंदना देण्यासाठी व श्रद्धांजली वाहण्यासाठी तसेच देशात शांतता राहावी म्हणून “स्टॉप टेरेरिझम’ हा संदेश घेऊन केदार विजय साळुंखे या चिमुकल्या मुलाने सांगली ते कोल्हापूर हे 55 किलोमीटरचे अंतर स्केटिंग रॅलीद्वारे पूर्ण केले.

आज सकाळी 6.30 वाजता सांगली येथील अशोक कामटे विश्रामगृह येथून सांगलीचे डी.वाय.एस.पी.वीरकर यांच्या उपस्थितीत त्याने आपल्या या विक्रमी उपक्रमास सुरुवात केली होती. कोल्हापूरमध्ये पोलीस अधीक्षक कार्यालय येथे 10 वाजून 8 मिनिटांनी पोहोचला. कोल्हापूरमध्ये आल्यानंतर त्याचे जल्लोषात स्वागत करण्यात आले विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांच्या हस्ते त्याचे जल्लोषात आणि फटाक्‍यांच्या आतषबाजीने स्वागत करण्यात आले. कोल्हापूर येथील पोलीस ग्राउंड येथे उभा करण्यात आलेल्या तिरंगा या ठिकाणी त्याचा भव्य सत्कार करण्यात आला. त्याच्या या विश्वविक्रमाची नोंद एशिया पॅसिफिक बुक ऑफ रेकॉर्ड ,नॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड आणि चाईल्ड बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड (ग्लोबल) यामध्ये झाली.

केदार विबग्योर हायस्कुल कोल्हापूर मध्ये शिक्षण घेत आहे. तो वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय साळुंखे व पोलिस उपाधिक्षक स्वाती गायकवाड साळुंखे यांचा मुलगा आहे .कोल्हापूरमध्ये आल्यानंतर त्याचे कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील, जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, महापौर शोभा बोन्द्रे, स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे अभयकुमार साळुंखे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत झांजपथक व पोलीस बॅन्ड वाजवून स्वागत करण्यात आले.

यावेळी बोलताना विश्वास नांगरे पाटील यांनी केदारचे हे विशेष कौतुक केले. त्याच्या आई-वडिलांनी त्याला योग्य मार्गदर्शन करून चांगले घडविले असून त्याचे भविष्य चांगले आहे कोल्हापूरमध्ये ऐतिहासिक तिरंगा ध्वज असलेल्या ठिकाणी ज्यांनी काम केले त्यांच्यासाठी मानवंदना देणे हे वेगळे कार्य आहे. सहा वर्षे चिमुकल्या केदारने हे केले आहे. अशा शब्दात त्यांनी त्याचे कौतुक केले. यावेळी महापौर शोभा बोंद्रे यांनीही केदारचे कौतुक केले.

जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांच्या हस्ते व विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांच्या वतीने शहिदांना मानवंदना व श्रद्धांजली अर्पण करण्यात आली .याचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

अडीच वर्षाच्या वयातच स्केटिंगचे धडे 

केदार याने ब्रेकअपसाठी लागणारे 42. 195 किलोमीटरचे अंतर 2 तास 42 मिनिटात पूर्ण केले . 3 तास 38 मिनिट त्याने 55 किलोमीटरचे अंतर पूर्ण केले. केदार हा चार ते साडेचार तास नियमित प्रॅक्‍टिस करत होता. त्याने हा विक्रम केला आहे त्याचे 227 देशात नाव झाले असल्याचे केदारचे कोच महेश कदम यांनी सांगितले. केदार हा अडीच वर्षाचा असल्यापासून स्केटिंगचे प्रशिक्षण राजश्री श्री छत्रपती शाहू महाराज प्रशिक्षण केंद्र येथे घेत आहे शिक्षक महेश कदम तेजस्विनी कदम व धनश्री कदम यांचे त्याला सहकार्य केले.त्यांनी आतापर्यंत 105 किलोमीटर स्केटिंग रॅली कोल्हापूर ते अजनी सांगली पूर्ण केली आहे जी 5 किलोमीटर अंतराची लोकमत मॅरेथॉन त्याने पूर्ण केली आहे त्याने आतापर्यंत 4 गोल्ड मेडल ,6 सिल्वर मेडल आणि दोन ब्रॉंझ मेडल मिळवले आहेत.

What is your reaction?
1 :thumbsup:
1 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)