सहा वर्षांच्या चिमकुलीवर लैंगिक अत्याचार

तळेगाव दाभाडे – अंगणात खेळत असलेल्या सहा वर्षाच्या चिमुकलीवर एका 65 वर्षांच्या वृद्ध नराधमाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना सोमवारी दुपारी पाचाणे येथे घडली. हा वासनांध वृद्ध पळून गेला असून पोलीस त्याच्या मागावर आहेत.

विनायक तुकाराम येवले (वय 65 रा. पाचाणे ता. मावळ) असे लैंगिक अत्याचार व विनयभंग केलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी दुपारी लहान मुलगी खेळत असताना आरोपी विनायक येवले याने तिचा हात धरुन तिला घरात ओढत नेले. तिच्यावर अतिप्रसंग करत असताना मुलीचे काका आल्याचे लक्षात येताच येवले तिथून पळून गेला.

मुलीने घडला प्रकार कुटुंबियांना सांगितल्यावर मुलीच्या आईने तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली, त्यानुसार आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गिरीश दिघावकर करत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)