पिंपरी: सहा लाखांचा ऐवज लंपास

पिंपरी – लक्ष्मीनगर, लिंक रोड येथील बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी कपाटातील तब्ब्ल सहा लाख रुपयांचा ऐवज लंपास केला.

प्रभाकर यशवंत दुवेदी (वय-67) यांनी याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुवेदी हे बाहेरगावी गेले असताना चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे कुलूप उचकटून घरातील कपाटातील 5 लाख 94 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पोलीस तपासत आहेत. चिंचवड पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)