सहा राज्यातील प्रकल्पांना हरित लवादाचा ब्रेक

पश्‍चिम घाट संवर्धनासाठी पर्यावरण विषयी मंजूरी रोखली

नवी दिल्ली – पश्‍चिम घाटावरील पर्यावरणाचे रक्षण करण्याच्या हेतूने राष्ट्रीय हरित लवादाने सहा राज्यांमधील प्रकल्पांना ब्रेक लावला आहे. पश्‍चिम घाटावरील सहा राज्यांनी पर्यावरणाला धोका पोहोचू शकणाऱ्या प्रकल्पांना पर्यावरण विषयक मंजूरी देऊ नये, असे आदेश हरित लवादाने दिले आहेत. पश्‍चिम घाटाशी संबंधित अधिसूचनेचा मसुद्याची मुदत 26 ऑगस्ट रोजी समाप्त झाल्याने हा मसुदा नव्याने प्रसिद्ध करण्याची परवानगीही लवादाने पर्यावरण मंत्रालयाला दिली आहे. तसेच उल्लेख असलेल्या पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील भागात कोणतेही फेरबदल न करता अधिसूचनेला अंतिम स्वरुप देण्याची सूचनाही करण्यात आली आहे.

अधिसूचनेवरील आक्षेप नोंदवण्यास उशीर केल्याबद्दल हरित लवादाचे अध्यक्ष न्या. आदर्श कुमार गोयल यांनी सहा राज्यांवर ताशेरे ओढले आहेत. हे आक्षेप नोंदवण्यास झालेला उशीर पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील भागांच्या रक्षणाच्या हिताचा नाही, असेही लवादाने सुनावले.

पश्‍चिम घाट हा जैववैविध्यतेसाठी सर्वात समृद्ध भाग असून त्याचे संवर्धन होण्याची गरज आहे. पश्‍चिम घाटाशी संबंधित 27 फेब्रुवारी 2017 रोजीच्या अधिसूचनेमध्ये फेरबदल झाल्यास त्याचा पर्यावरणावर विपरीत परीणाम होईल. विशेषतः केरळमधील अलिकडील घटना पाहता पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील भाग कमी करण्याबाबतचा कोणताही बदल हरित लवादाकडून विचार झाल्याशिवाय करू नये, अशी सूचनाही करण्यात आली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)