सहा महिन्यांनी गुल पनागचे गुपित उलगडले

अभिनेत्री गुल पनागने सहा महिन्यांपूर्वीच बाळाला जन्म दिला. मात्र आपले वैयक्तिक आयुष्य जपण्यासाठी तिने ही गोष्ट जगजाहीर केली नाही. आजकाल बाळाचा जन्म होत नाही, तोच त्याचा पहिला फोटो सोशल मीडियावर पोस्ट करण्याची घाई आई-वडिलांना लागलेली असते. गुल पनागने मात्र हा प्रकार जाणीवपूर्वक टाळला.

सहा महिन्यांपूर्वी गुलच्या बाळाचा जन्म झाला. त्यावेळी बाळ प्रिमॅच्युअर होते. त्याचे निहाल असे नामकरण करण्यात आले. मात्र मित्र आणि नातेवाईक यांनाच ही गोष्ट माहित होती. सर्वांनीच गुलचे हे गुपित पाळून ठेवले. “पालकत्व हा आगळावेगळा अनुभव असतो. ऋषी आणि मी आमची प्रायव्हसी जपण्याचे ठरवले होते. लोकांचे लक्ष वेधून घेण्याऐवजी वैयक्तिक आनंद घेण्याचा निर्णय आम्ही घेतला’ असे गुल सांगते.

-Ads-

जेव्हा एखाद्या स्त्रीला आपल्या आयुष्यात बाळ यावे, असे वाटते, तेव्हाच तिने आई होण्याचा निर्णय घ्यावा. समाज आणि कुटुंबीय मागे लागत आहेत, म्हणून मातृत्व अनुभवण्यात काय हशील? असा प्रश्न गुल विचारते. 39 वर्षीय गुल पनागने डोर, हेलो, मनोरमा सिक्‍स फीट अंडर यासारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. 2014 लोकसभा निवडणुकीत ती “आप’कडून चंदिगढमधून उमेदवार होती.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)