सहा टन गोमांस जप्त, दोघांना अटक

पिंपरी – अहमदनगर येथून मुंबई येथे गोमांसाची विक्री करण्यासाठी निघालेला टेम्पो मंगळवारी (दि.29) पहाटे पिंपरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत पकडण्यात आला. यामध्ये सहा टन गोमांस जप्त करण्यात आले आहे. हिंदू संघटनांच्या कार्यकर्त्यांनी दिलेल्या माहितीवरुन पिंपरी पोलिसांनी ही कारवाई केली. पशुकल्याण अधिकारी शिवशंकर स्वामी यांनी फिर्याद दिली.

पिंपरी येथील कुरेशी हॉटेलच्या मागील गल्लीतून गोमांसाची वाहतुक करणारा टेम्पो (क्र,एमएच03.सीपी .1630) जाणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानंतर गोरक्षकांनी पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून जुना पुणे मुंबई रस्त्यावर पोलिसांची मदत मागितली. त्यानंतर हा टेम्पो पिंपरी पोलीस स्टेशनला आणण्यात आला. टेम्पोचालक अब्दुल रहमान अतीक महंमद खान व क्‍लिनर अहसान महंमद इंद्राशी याच्याकडे चौकशी केली असता त्याने अहमदनगर येथून गोमांस मुंबई येथे घेऊन जात आहे असल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांच्या समक्ष पशुवैधकीय अधिकारी डॉ. श्री देशपांडे व शिवशंकर स्वामी यांनी या मांसाची तपासणी केली.

-Ads-

पिंपरी ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आर.आर. ठुबल व पोलिस कर्मचाऱ्यांनी ही कामगिरी बजावली. गोमांस विक्री प्रकरणातील सर्व आरोपींवर महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा सुधारित 1995 चे कलम 5 ( क ), 9 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी पोलीस तपास करत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)