सहाव्या सुदेश शेलार स्मृती राष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेला शुक्रवारी प्रारंभ

11स्पोर्टस पुरस्कृत स्पर्धेत 1200 हून अधिक खेळाडूंचा विक्रमी सहभाग

पुणे – सुदेश शेलार मेमोरियल फाऊंडेशन व डेक्‍कन जिमखाना यांच्या संयुक्‍त प्रयत्नांतून आणि टेबल टेनिस फेडरेशन ऑफ इंडिया व महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस संघटना यांच्या मान्यतेने सहाव्या सुदेश शेलार मेमोरियल करंडक- 11स्पोर्टस राष्ट्रीय मानांकन टेबल टेनिस स्पर्धेचे दि. 5 ते 11 ऑक्‍टोबर या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे. श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे बालेवाडी येथील वेटलिफ्टिंग हॉलमध्ये रंगणाऱ्या या स्पर्धेला देशभरातील 1200 हून अधिक खेळाडूंचा विक्रमी प्रतिसाद लाभला आहे.

-Ads-

पत्रकार परिषेदत अधिक माहिती देताना स्पर्धेचे संचालक व माजी आंतरराष्ट्रीय टेबल टेनिसपटू राजेश शेलार यांनी सांगितले की, राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये देशभरांतील सर्वाधिक पारितोषिक रकमेची ही स्पर्धा आहे. या स्पर्धेसाठी शिष्यवृत्ती आणि पारितोषिके मिळून एकूण साडेबारा लाख रुपयांची पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. तसेच सुदेश शेलार मेमोरिअल फाऊंडेशनतर्फे दहा खेळाडूंना प्रत्येकी 40 हजार रुपयांची शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे.

या स्पर्धेत आशियाई क्रीडा पदक विजेता शरथ कमल, मनिका बात्रा, हर्मित देसाई, अँथोनी अमलराज, राष्ट्रकुल पदक विजेता सनिल शेट्टी, मधुरिका पाटकर, सुतीर्थ मुखर्जी, मौमा दास, पूजा सहस्त्रबुद्धे कोपरकर यांसह स्वस्तिका घोष, दिया चितळे, राधिका सकपाळ यांसारखे दिग्गज खेळाडू या स्पर्धेत झुंजणार आहेत. स्पर्धेला शुक्रवार, दि. 5 ऑक्‍टोबर रोजी प्रारंभ होणार असून वरिष्ठ, यूथ व कुमार गटांतील अंतिम फेरीचे सामने मंगळवार, दि. 9 रोजी होणार आहेत. कुमार गटाच्या अंतिम फेरीचे सामने दि. 10 रोजी, तर सब-ज्युनियर व कॅडेट गटाचे अंतिम सामने दि. 11 रोजी होणार आहेत. स्पर्धेतील विजेत्या, उपविजेत्या खेळाडूंसह उपान्त्य व उपान्त्यपूर्व फेरीतील खेळाडूंनाही आकर्षक रोख रकमेची पारितोषिके देण्यात येणार आहेत.

ही स्पर्धा 12, 15, 18 व 21 वर्षांखालील, तसेच पुरुष व महिला खुला गट अशा 10 गटांत होणार आहे. सुदेश शेलार यांच्या स्मरणार्थ या स्पर्धेचे दरवर्षी आयोजन करण्यात येते. सुदेश शेलार हे स्वतःएक राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू होते आणि पुणे जिल्हा टेबल टेनिस संघटना (पीडीटीटीए) व डेक्‍कन जिमखाना टेबल टेनिस विभागाचे सचिव होते. क्रीडा क्षेत्रात अधिकाधिक गुणवान खेळाडू घडावेत याकरिता सुदेश शेलार यांनी राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक स्पर्धांचे आयोजन केले होते.

स्पर्धेला 11स्पोर्टस, स्टॅग, एचपीसीएल, मोतीलाल ओसवाल, आयसीआयसीआय प्रुडेंशियल म्युचुअल फंड स्कीम, सुराणा अँड बोथरा कन्स्ट्रक्‍शन, निस्सान, मेडलाईफ यांचे प्रायोजकत्व लाभले आहे. सहा ऑक्‍टोबर रोजी होणाऱ्या प्रमोशनल ऍक्‍टिव्हिटीसाठी वेस्टएंड मॉल हे मॉल पार्टनर आहेत. स्पर्धेसाठी मुख्य रेफ्री म्हणून गणेशन अय्यर यांची नियुक्ती करण्यात आली असून स्पर्धेचे ड्रॉ 4 ऑक्‍टोबर रोजी स्पर्धेच्या ठिकाणी लावण्यात येणार आहेत. आशियाई व राष्ट्रकुल स्पर्धेतील पदक विजेत्या खेळाडूंना 11स्पोर्टसच्या विता दाणी यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)