सहाव्या फेरीतील प्रवेशाची आज शेवटची संधी

अकरावी प्रवेश: आतापर्यंत एक हजार विद्यार्थ्यांना प्रवेश

पुणे – अकरावी प्रवेश प्रक्रियेत आरक्षणबाबत आक्षेप घेतल्यानंतर जैसे थे स्थितीत प्रवेश सुरु असून आरक्षण काढल्यानंतर तब्बल 1 हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश सहाव्या फेरीत झालेले असल्याची माहिती अकरावी केंद्रीय प्रवेश समितीच्या सचिव मिनाक्षी राऊत यांनी दिली. दरम्यान सहाव्या फेरीतील प्रवेशाची मंगळवारी शेवटची संधी असणार आहे.

अकरावी प्रवेशाच्या आतापर्यंत कोट्यातील प्रवेशासाठीची शून्य फेरी, नियमित चार फेऱ्या तर एक विशेष फेरी पूर्ण झाली असून ही दुसऱ्या विशेष म्हणजेच सहाव्या फेरीतील प्रवेश सध्या देणे सुरु आहे. यानुसार प्रथम येणाऱ्यास प्रथम प्रवेश या पध्दतीने हे प्रवेश देण्यात येत आहेत. पुणे व पिंपरी चिंचवड परिसरात आतापर्यंत 1 हजार 685 विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आले होते त्यापैकी 1 हजार 32 विद्यार्थ्यांनी आपले प्रवेश निश्‍चित केले आहेत. तर 12 विद्यार्थ्यांचे अर्ज रद्द करण्यात आले असून 641 विद्यार्थ्यांनी प्रवेश मिळूनही तो घेतलेला नसल्याची माहिती राऊत यांनी दिली.

राऊत म्हणाल्या, पसंतीक्रमानुसार ग्रुप तीनमधील प्रवेश मंगळवारी सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुरु रहाणार आहेत. तिसरी विशेष फेरी पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण झालेले विद्यार्थी व अद्यापही प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी पुरवणी परीक्षेचा निकाल लागल्यानंतर जाहीर करण्यात येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)