सहाव्या दिवशी चार अर्ज दाखल

मलकापूर निवडणुक ; एकूण 104 अर्जाची विक्री

कराड – मलकापूर नगरपरिषदेच्या पंचवार्षिक निवडणूकीसाठी ऑनलाईन अर्ज दाखल करण्याच्या सहाव्या दिवशी चार उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. यापैकी प्रभाग क्र. 1 साठी दोन अर्ज, प्रभाग क्र. 3 व 9 साठी अनुक्रमे एक अर्ज दाखल करण्यात आला आहे. यामध्ये शिवसेनेचे तालुकाप्रमुखांचे दोन अर्ज व अन्य दोन अर्जांचा समावेश आहे. अर्ज दाखल करण्याच्या सहाव्या दिवशी 20 नामनिर्देशन अर्जाची विक्री झाली असून सहा दिवसात एकूण 104 वर नामनिर्देशन अर्जाच्या विक्रीची संख्या गेली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मलकापूर नगरपरिषदेच्या एकूण 9 प्रभाग असून नारायण विष्णुपंत काशीद यांनी प्रभाग 1 साठी दोन स्वतंत्र उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. तर अलका अशोक जगदाळे यांनी प्रभाग 3 साठी व विलास आनंदराव पवार यांनी प्रभाग क्रमांक 9 साठी आपले नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे. तीन उमेदवारांचे चारही अर्ज सर्वसाधारण प्रवर्ग आरक्षित प्रभागासाठीचे आहेत.

सोमवारी एकूण 20 अर्जाची विक्री झाली असून आत्तापर्यंत एकूण 104 उमेदवारी अर्जाची विक्री झालेली आहे. ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची मुदत 9 जानेवारी पर्यत आहे. त्यामुळे इच्छुकांसाठी अर्ज दाखल करण्यासाठी केवल दोनच दिवसांचा अवधी राहिला आहे. यामुळे दोनच दिवसात कॉंगेस व भाजप या दोन्ही प्रमुख पक्षांव्यतिरिक्त अन्य अपक्ष आपले उमेदवारी अर्ज दाखल करतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)