सहारियांचा खर्च सादरीकरणासाठी ऑनलाईनचा अट्टहास

-उमेदवारांवर अपात्रतेची टांगती तलावर
-प्रचार सोडून उमेदवारांची सायबर कॅफेवर होणार गर्दी

नगर – महापालिका निवडणूक लढवत असलेल्या उमेदवारांना त्यांचा निवडणूक खर्च हा ट्रू वोटर ऍपद्वारेच ऑनलाईन पद्धतीचे सादर करण्याचा अट्टहास राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त राजेश्‍वर सहारिया यांनी केला आहे. या ऍपद्वारेच उमेदवारांना निवडणुकीचा खर्च सादर करावा लागणार आहे. गेल्यावेळेस झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांबरोबर नंदूबार आणि गडचिरोलीतून ऍपद्वारेच उमेदवारांनी खर्च सादर केला होता. तो येथे का सादर होणार नाही, असा प्रश्‍न करत ऑनलाईनपद्धतीने निवडणूक खर्च सादर न करणाऱ्या उमेदवारांना अपात्र ठरविले जातील, असेही सहारिया यांनी स्पष्ट केले.

नगरमध्ये महापालिका निवडणुकीसाठी नऊ डिसेंबरला मतदान होत आहे. प्रशासकीय पातळीवर त्याची जय्यत तयारी सुरू आहे. या निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी सहारिया आज नगरमध्ये आले होते. सहारिया यांनी सर्वात प्रथम निवडणूक कामकाज संबंधी नियुक्त करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांची बैठकही घेतली.

जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी बैठकीला उपस्थित होते.सहारिया म्हणाले, “निवडणूक खर्च हा उमेदवारांना “ऍप’वर ऑनलाईनपद्धतीने भरणे बंधनकारक आहे. या “ऍप’वर खर्च सादर न करणाऱ्यांना सर्वांना आगदोर नोटीस द्या. त्यानंतर ही ऑनलाईन खर्च सादर न केल्यास पुढील निर्णय घ्या.’ निवडणूक खर्च तपासणीसाठी दोन आयकर आणि चार विक्रीकर अधिकारी यांची नियुक्त करण्याचीही सूचना त्यांनी केली आहे. राज्य निवडणूक आयोगाचे निर्देशांचे तंतोतंत पाळण करण्याच्याही सूचना त्यांनी दिल्या. उमेदवारांवर अपात्रतेची टांगती तलावर प्रचार सोडून उमेदवारांची सायबर कॅफेवर होणार गर्दी

 

अतिसंवेदनशील मतदान केंद्रांत वाढ होणार
अहमदनगर महापालिका निवडणुकीसाठी एकूण केंद्रापैकी 134 संवेदनशील व 41 अतिसंवेदनशील मतदान केंद्र आहेत. पोलिसांच्या प्राथमिक अहवालानुसार ही माहिती राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त राजेश्‍वर सहारिया यांच्यासमोर सादर करण्यात आली. परंतु या केंद्रामध्ये वाढ होण्याची शक्‍यता आहे. या सर्व केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार असल्याची माहिती सहारिया यांना पोलीस अधीक्षक रंजन कुमार शर्मा यांनी यावेळी दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)