सहाराला दिलासा; अॅम्बी व्हॅलीतील मालमत्ता 15 मेपर्यंत विकण्यास परवानगी

नवी दिल्ली – सर्वोच्च न्यायालयाने आज सहारा समुहाला दिलासा देताना महाराष्ट्रातील अॅम्बी व्हॅली सिटी प्रोजेक्‍टमधील कुठलीही मालमत्ता 15 मेपर्यंत विकण्यास परवानगी दिली.
लिलावाच्या माध्यमातून अपेक्षित रक्कम उभी राहणार नाही, अशी बाजू सुनावणीवेळी सहारा समुहाच्या वतीने मांडण्यात आली. ती ऐकून घेत न्यायालयाने सहाराला प्रोजेक्‍टमधील पसंतीची मालमत्ता निवडून ती विकण्यासाठी मुदत दिली.

मालमत्ता विकून आलेली रक्कम सेबी-सहारा रिफंड अकाऊंटमध्ये जमा करण्याचा आदेश न्यायालयाने दिला. सहारा समुहाला 15 मेपर्यंत मालमत्ता विकण्यास अपयश आल्यास मुंबई उच्च न्यायालयाचे लिक्विडेटर लिलावाची प्रक्रिया पुढे नेतील, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. याप्रकरणाची पुढील सुनावणी आता 16 मे यादिवशी होणार आहे.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)