सहाय्यक ग्रंथालय संचालक बनले “नामधारी’च

विभागीय कार्यालयातील कामांच्या विकेंद्रीकरणामुळे

पुणे – राज्य शासनाने विभागीय सहाय्यक ग्रंथालय संचालक कार्यालयांच्या कामांचे विकेंद्रीकरण केल्यामुळे सहाय्यक ग्रंथालक संचालकांना फारसे अधिकारच राहिलेले नाहीत. त्यामुळे आता हे अधिकारी केवळ “नामधारी’च झाले आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शासनाच्या ग्रंथालय संचालयनाच्या अधिपत्याखालील सहाय्यक ग्रंथालय संचालक कार्यालयांच्या कामकाजासाठी मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याने विभागीय ठिकाणाहून सर्व जिल्ह्यांचा कारभार नियंत्रित करावा लागत असल्याने मनुष्यबळ वाया जाते. त्यामुळे शासनावर आर्थिक भार पडतो. सर्वसामन्य जनतेला कामकाजाच्या दृष्टीकोनातून अधिक त्रासही होता. कामकाजात एकसूत्रता व गतीमानता आणण्यासाठी सुशासनच्या दृष्टीकोनातून विभागीय सहाय्यक ग्रंथालय संचालक कार्यालयांच्या कामांचे विकेंद्रीकरण करुन त्याचे जिल्हा ग्रंथालय कार्यालयात वाटप करण्यात आलेले आहे.

जिल्ह्याच्या ठिकाणी कार्यरत असलेल्या “ग्रंथपाल’ या पदनामात “जिल्हा ग्रंथालय कार्यालय अधिकारी’ असा बदल करण्यात आलेला आहे. त्यामुळे आता विभागीय कार्यालयांऐवजी जिल्हा ग्रंथालय कार्यालयांच्या अधिकारात वाढ झालेली आहे. जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या ग्रंथालयीन सेवा व त्यासाठी आवश्‍यक निधी उपलब्ध करणे, जिल्हा नियोजन समितीशी निगडीत सर्व कामे व शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांची अनुदानविषयक सर्व कामे पाहण्याची जबाबदारी जिल्हा ग्रंथालय कार्यालय अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आलेली आहेत. त्यामुळे सहाय्यक ग्रंथालय संचालकांपेक्षा जिल्हा ग्रंथालय कार्यालय अधिकाऱ्यांचे अधिकार वाढविण्यात आलेले आहेत.

आता सहाय्यक ग्रंथालय संचालकांकडे त्या त्या विभागातील सर्व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयांवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी आहे. जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयांकडून आलेले सर्व प्रस्ताव व अन्य माहिती अंतिम मंजूरीसाठी शासनाच्या ग्रंथालय संचालनालयाकडे सादर करण्याची जबाबदारीही सहाय्यक ग्रंथालय संचालकांकडे सोपविण्यात आलेली आहे. त्यामुळे आता या अधिकाऱ्यांकडे फारसे कोणतेच अधिकार राहिले नाहीत. महत्वाचे कोणतेच अधिकार नसल्याबाबत या अधिकाऱ्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. विकेंद्रीकरणामुळे आम्हाला फारसे अधिकारच राहिले नाहीत. आम्ही केवळ “नामधारी’च राहिलो आहे, असे या अधिकाऱ्यांकडूनच सांगण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)