सहाय्यक आयुक्‍तांच्या रिकाम्या खुर्चीला हार

पिंपरी – सभावृत्तांत घेण्यासाठी आलेल्या प्रहार आंदोलनाच्या पदाधिकाऱ्यांनी दोन तास वाट पाहूनही नागरवस्ती विभागाच्या सहाय्यक आयुक्‍त स्मिता झगडे उपस्थित राहिल्या नाहीत. त्यामुळे संतापलेल्या या पदाधिकाऱ्यांनी झगडे यांच्या रिकाम्या खुर्चीलाच हार घालून प्रशासनाच्या नाकर्तेपणाच्या भूमिकेचा अभिनव पद्धतीने निषेध केला.

प्रहार अपंग क्रांती आंदोलन संस्था आणि नागरवस्ती विकास योजना विभागाची एकत्रित सभा पार पडली होती. या सभेचा वृृत्तांत घेण्यासाठी पदाधिकारी बुधवारी (दि. 30) या विभागात आले. सहाय्यक आयुक्‍त स्मिता झगडे यांच्याकडून ही माहिती मिळणे अपेक्षित होते. त्याकरिता महापालिका मुख्यालयाच्या तळमजल्यावर असलेल्या नागरवस्ती विभागात हे सर्व पदाधिकारी त्यांची भेट घेण्यासाठी आले होते. मात्र, याठिकाणी एकही जबाबदार अधिकारी उपस्थित नसल्याने दोन तास वाट पाहिली. त्यानंतर मात्र, या पदाधिकाऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत झाला. या पदाधिकाऱ्यांनी बाहेरून एक हार मागवून सहाय्यक आयुक्‍त स्मिता झगडे यांच्या रिकाम्या खुर्चीला घालून निषेध केला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सतत पाठपुरावा करुनही अपंग विभागासाठी स्वतंत्र उपायुक्त नेमणे व शहरात होत असलेल्या अपंग भवनाबाबत संघटने बरोबर बैठक घेण्याबाबत निर्णय होत नाही व झालेल्या सभेचा वृत्तांत मिळत नसल्याने संघटनेच्या वतीने अध्यक्ष दत्तात्रय भोसले, उपाध्यक्ष राजेंद्र वाकचौरे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

महापालिका प्रशासनाकडून अपंग बांधवांच्या समस्या फारशा गांभिर्याने घेतल्या जात नसल्याचा आजवरचा आमचा अनुभव आहे. याबाबत अनेकदा उपायुक्‍त संतोष पाटील आणि सहाय्यक आयुक्‍त स्मिता झगडे यांची भेट घेऊनही त्यामध्ये परक पडलेला नाही. आजदेखील दोन तास वाट पाहूनही नागरवस्ती विभागात काही जबाबदार अधिकारी उपस्थित न राहिल्याने झगडे यांच्या रिकाम्या खुर्चीला हार घालून या आंदोलनाच्या माध्यमातून प्रशासनाचा आम्ही निषेध केला आहे.
– दत्तात्रय भोसले, अध्यक्ष, प्रहार अपंग क्रांती आंदोलन.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)