सहायक प्राध्यापक भरतीस गती कधी?

– व्यंकटेश भोळा

पुणे – राज्य शासनाने सहायक प्राध्यापकांच्या पदभरतीचा आदेश जारी केला. त्यामुळे हा निर्णय दिलासादायक असला, तरी त्याची प्रत्यक्ष वेगाने कार्यवाही होताना दिसत नाही. उच्च शिक्षण विभागाने कार्यवाहीचे आदेश दिले. मात्र आता “रोस्टर’ची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत पदभरती करता येणार नाही. निर्णय झाला, तरी प्रत्यक्ष पदभरती सुरू करण्यासाठी नेट-सेट व नवप्राध्यापक उमेदवारांना आंदोलन करावे लागत आहे, ही बाब भूषणावह नाही.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

राज्यातील अनेक महाविद्यालयांमध्ये प्राध्यापक, सहायक प्राध्यापकांची सध्या सुमारे 12 हजार पदे रिक्त आहेत. दरमहा रिक्‍त पदांत वाढ होत आहे. गेल्या काही वर्षांपासून भरती प्रक्रिया बंद असल्याने या जागांवर तुटपुंज्या मानधनावर तासिका तत्त्वावरील (सीएचबी) सहायक प्राध्यापक अध्यापनाचे काम पुढे नेत आहेत. अशा परिस्थितीत राज्य शासनाने सहायक प्राध्यापक भरतीवरील बंदी उठविली. आता सेट-नेट, पीएच.डी. उमेदवारांना प्राध्यापक होण्याची संधी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे या निर्णयाचे शिक्षण क्षेत्रातून जोरदार स्वागत झाले.

उच्च शिक्षण संचालनालयाने अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमधील सहायक प्राध्यापकांची रिक्त पदे भरण्यावरील निर्बंध शिथील केले. त्याबाबतचा आदेशही शासनाने 3 नोव्हेंबर 2018 रोजी काढला. त्यानुसार पदभरतीची कार्यवाही करण्याच्या सूचना विभागीय उच्च शिक्षण विभागांना देण्यात आले. त्यानुसार पदभरतीची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, त्याला म्हणावी तशी गती नसल्याचे स्पष्ट होत आहे.

कोणत्याही पदाची भरती करताना रोस्टर (बिंदू नियमावली) ही प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य आहे. मागासवर्गीय कक्षाकडून त्या पदांना मान्यता मिळाल्यानंतर प्रत्यक्ष पदाची जाहिरात व त्यानुसार भरती करणे संस्थांना आवश्‍यक आहे. ही प्रक्रिया पुन्हा नव्याने संस्थाचालकांना करावी लागणार आहे. त्यामुळे या प्रक्रियेत बराच कालावधी जाणार आहे. निवडणुका डोळ्यांसमोर हा निर्णय घेतल्याची टीका होत आहे. त्यात निवडणुकांपूर्वी रोस्टर प्रक्रिया पूर्ण होणे शक्‍य नाही. त्यामुळे हे सर्व पदभरती प्रक्रिया आचारसंहितेच्या कचाट्यात सापडतील का? अशी भीती सेट-नेट उमदेवारांपुढे निर्माण होत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर आवश्‍यक सर्व प्रक्रिया पूर्ण तातडीने प्राध्यापकांची भरती करावी, अशी मागणी उमेदवारांकडून होत आहे. त्यासाठी आंदोलने होत आहे. निर्णय झाला तरी प्रत्यक्ष अंमलबजावणी होण्यास विलंब होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहे. त्यामुळे नवप्राध्यापकांमध्ये तीव्र नाराजी आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)