सहस्त्रबुध्देंची पुस्तके वाचकांसाठी मेजवानी

प्रा. डॉ. सु. प्र. कुलकर्णी, डॉ अनिल सहस्त्रबुध्दे यांच्या दोन पुस्तकांचे प्रकाशन

नगर – “”नारद म्हणजे कळ लावणारा ही प्रतिमा या पुस्तकांच्या माध्यमातून पुसून टाकली आहे. सहस्त्रबुध्दे यांनी विविध अंगांनी विचार करून ही पुस्तके लिहिली आहेत. साहित्याचा समाजात कसा वापर होत आहे, साहित्याची कशी गरज आहे यावर योग्य भाष्य करणारी ही दोन पुस्तके असून, नगरकरांकरिता ती छान मेजवानी आहे. “नारद’ ही कादंबरी पुनर्मुद्रण केली आहे. सहस्त्रबुध्देंची पुस्तके नगरकरांची पसंती आहे. वाचकांसाठी ती मेजवानी ठरत आहेत,” असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक, समीक्षक, संशोधक आणि महाराष्ट्र साहित्यपत्रिकेचे माजी संपादक प्रा. डॉ. सु. प्र. कुलकर्णी यांनी केले.

डॉ. अनिल सहस्त्रबुध्दे यांच्या दोन पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. औरंगाबादचे चिन्मय प्रकाशन यांनी प्रकाशित केलेले साहित्याची समग्रता व साहित्य प्रचिती, पुण्याच्या पद्मगंधा प्रकाशनने प्रकाशित केलेली “नारद’ ही कादंबरी प्रकाशन ज्येष्ठ साहित्यिक, समीक्षक, संशोधक आणि महाराष्ट्र साहित्यपत्रिकेचे माजी संपादक प्रा. डॉ. सु. प्र. कुलकर्णी, प्रा. डॉ. एम.एस. बागवान यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. यावेळी म.सा.प.चे जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत पालवे, ह.भ.प. अशोकानंद महाराज कर्डिले आणि ज्येष्ठ पत्रकार महादेव कुलकर्णी, आकाशवाणीचे प्रदीप हलसगीकर, आनंदोत्सवचे अध्यक्ष व मुख्य विश्‍वस्त डॉ. अनिल सहस्त्रबुद्धे, उषा सहस्त्रबुध्दे, डॉ. मच्छिंद्र मालुंजकर, विनायक पवळे, डॉ. माहेश्‍वरी गावीत, डॉ. राजू रिक्कल, ऋता ठाकूर, आदी मान्यवर उपस्थित होते.

डॉ. अनिल सहस्त्रबुद्धे म्हणाले की, नगरकरांच्या प्रेम, प्रोत्साहनामुळेच हे शक्‍य होत आहे. चांगल्या निर्मिती करण्याचे प्रयत्न करत आहे. समाजाला पुस्तकांच्या माध्यमातून नवीन काही देण्याच्या छोट्याशा प्रयत्नाला आपल्यासारख्या रसिकांची दाद महत्त्वाची असते. ती वारंवार पुस्तकांच्या पुनर्मुद्रणाच्या माध्यमातून मिळते. पुस्तक परिचय डॉ. माहेश्‍वरी गावीत यांनी करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मच्छिंद्र मालुंजकर यांनी केले. प्रास्ताविक उषा सहस्त्रबुध्दे यांनी केले. पुस्तक प्रकाशन सोहळ्यास मान्यवर रसिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)