सहवीज निर्मिती प्रकल्पाच्या करारावर शासनाने अनुदान द्यावे

न्हावरे- कारखाना कार्यक्षेत्रात आडसाली उसाचे प्रमाण 20 टक्क्‌यापेक्षा कमी करणे हे कारखान्यासमोर आव्हान आहे. एफआरपी ही रिकव्हरीवर अवलंबून असते. त्यामुळे आडसाली उसाचे प्रमाण कमी करणे हे सर्वच सभासदांच्या हिताचे आहे. तसेच सहवीज निर्मिती प्रकल्पाच्या करारावर शासनाने अनुदान द्यावे, अशी मागणी यावेळी अशोक पवार यांनी केली.
न्हावरे (ता. शिरूर) येथील रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचा 22 वा बॉयलर अग्नीप्रदीपन आणि गव्हाण पूजन शुभारंभ तालुक्‍यातील कीर्तनकार आणि प्रवचनकार महाराज यांच्या हस्ते पार पडला. संपूर्ण जिल्ह्यात रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याने सातत्याने अनोखा उपक्रम राबवून सामाजिक आदर्श निर्माण केला आहे.
यावेळी सुमारे 200 हून अधिक कीर्तनकार आणि प्रवचनकार महाराज उपस्थित होते. पहिल्यांदा उपस्थित महाराजांच्या हस्ते बॉयलर अग्निप्रदीपन झाले. त्यानंतर गव्हाण पूजन करून गव्हाणीमध्ये ऊसाची मोळी टाकून कारखान्याचा गाळप हंगाम शुभारंभ पार पडला. यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी समस्त महाराजांच्या वतीने प्रातिनिधिक स्वरुपात कीर्तन केसरी ह.भ.प. पुंडलिक महाराज नागवडे, संतराज महाराज देवस्थानचे अध्यक्ष ह.भ.प.सुरेश साठे, ह.भ.प.रामदास साठे, ह.भ.प. नवनाथ माशेरे, ह.भ.प. अभिजीत जाचक यांनी कारखान्याच्या गाळप हंगामाला शुभेच्छा दिल्या. तसेच ह.भ.प.सायली सातकर, ह.भ.प.अविनाश साळुंके, ह.भ.प.आनंदा महाराज टाकळीकर, ह.भ.प.बापू निगडे, ह.भ.प.नवनाथ भोसले, ह.भ.प. शिवाजी मचाले, ह.भ.प. रामदास फडके, ह.भ.प. राजेंद्र गरुड, ह.भ.प. बाळासाहेब भोसले इत्यादी कीर्तनकार महाराज आणि प्रवचनकार महाराज उपस्थित होते.
यावेळी कारखान्याचे अध्यक्ष, माजी आमदार ऍड.अशोक पवार म्हणाले, प्रायोगिक तत्त्वावर घोडगंगा कारखान्याच्या वतीने न्हावरे गाव सुमारे 70 टक्क्‌यांपर्यंत ठिबक सिंचनाखाली आणले जाणार आहे.
यावेळी शिरुर पंचायत समितीचे सभापती विश्वास कोहकडे, जिल्हा परिषदेच्या कृषी समितीच्या अध्यक्षा सुजाता पवार, खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष राजेंद्र नरवडे, घोडगंगाचे उपाध्यक्ष संतोष रणदिवे, शिरुर बाजार समितीचे उपसभापती विश्वास ढमढेरे, कारखान्याचे कार्यकारी संचालक संभाजी पाटील कारखान्याचे संचालक व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांचे स्वागत कारखान्याचे संचालक बाबासाहेब फराटे यांनी केले. तर प्रास्ताविक कारखान्याचे माजी उपाध्यक्ष प्रा. सुभाष कळसकर यांनी केले.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)