सहलीच्या आनंदावर काळाचा घाला

पिंपरी – दवाखान्याचे काम आटोपून डॉ. युवराज घाटोळे हे शनिवारी (दि. 18) रात्री जरा घाईतच दवाखान्यातून निघाले. त्यांना त्यांच्या मित्रांसोबत गणपती पुळेला जायचे होते. मात्र वाटेतच काळाने घाला घातला व त्यांचा अपघाती मृत्यू झाला. ही खबर वाऱ्यासारखी त्यांच्या काळेवाडी येथील घरी पोहचली आणि घराबरोबरच परिसरात शोककळा पसरली. आमचा मनमिळाऊ डॉक्‍टर गेला, अशी हळहळ त्यांच्या शेजाऱ्यांनी दैनिक “प्रभात’शी बोलताना व्यक्त केली.

डॉ. घाटुळे त्यांच्या इतर चार डॉक्‍टर मित्रांसोबत कारने गणपती पुळ्याला जाण्यासाठी निघाले होते. पारगाव खंडाळा येथे रविवारी (दि. 18) पहाटे एकच्या सुमारास त्यांच्या कारचा टायर फुटला. त्यामध्ये समोरील बाजूला बसलेल्या डॉ. घाटोळे यांचा जागीच मृत्यू झाला. डॉ. घाटोळे हे मुळचे सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्‍याच्या मांगेवाडीचे आहेत. तेथेच त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

डॉ. युवराज घाटोळे हे गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्या चुलत्यांसोबत काळेवाडी येथील ड्रायव्हर कॉलनी येथे रहात होते. त्यांचे डांगे चौक येथे स्वतःचे रुग्णालय होते. मनमिळाऊ स्वभाव, रात्री-अपरात्री मदतीला धावून जाण्याची वृत्ती यामुळे ते परिसरात सगळ्यांनाच परिचित होते. त्यांच्या पश्‍चात पत्नी व तीन मुले असा परिवार आहे. त्यातील खुशी व ओजस ही त्यांच्या पहिल्या पत्नीची मुले आहेत. पहिल्या पत्नीचा हृदयविकाराच्या धक्‍क्‍याने मृत्यू झाला. त्यानंतर त्यांनी दोन वर्षापूर्वी विवाह केला होता. तीन महिन्यांपूर्वीच नवीन बाळाचे आगमन झाले होते. बाळ, नवी गाडी या आनंदात सारा घाटोळे परिवार होता. मात्र काळाला त्यांचे सुख पाहवले नाही व चिमुकल्याचे पितृछत्र हरवले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)