सहज मिळालेल्या गोष्टींची किंमत नसते

भवानीनगर- सहज मिळालेल्या कोणत्याच गोष्टीची किंमत नसते. परंतु पैसे नसताना अनेक यातनांना सामोरे जात हलाकीचे जीवन जगत शिक्षण घेत मोठ्या पदावर विराजमाने होणे यालाच खरे जीवन म्हणतात, असे मत इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी व्यक्‍त केले.
युपीएससी तर्फे घेण्यात आलेल्या परीक्षेतून असिस्टंट कमांडट डीवायएसपी पदी भारत देशात 94 व्या क्रमांकाने निवड झाल्याबद्दल अल्ताफ महमंद शेखचा भवानीनगर (ता. इंदापूर) येथे आमदार भरणे यांच्या हस्ते करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. काटेवाडी (ता. बारामती) येथील स्व. पै. रहिमान पठाण मित्र परिवाराच्या वतीने या कार्यमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी भाऊसाहेब सपकळ, श्री छत्रपती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रशांत काटे, सागर भोईटे, मारुतराव काळे, संजय काटे, हरिश्‍चंद्र मासाळ, के. टी.जाधव, शरद काटे, यशवंत नरुटे, महादेव कचरे, सतीश काटे, राहुल घुले, अनिल काटे, पार्थ निंबाळकर, शितल काटे, शिवसेनेचे पप्पू माने, वसंत जगताप, पोलीस पाटील सचिन मोरे, ग्रामविकास अधिकारी बाळासाहेब भोईटे मुस्तफा सय्यद, शिवाजी लकडे, श्रीनिवास कदम, शब्बीर काझी, हमीद तांबोळी, राजाभाऊ जाधव, राजू पठाण, पीर खान, अब्दुल शेख, अमीर पठाण यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
अल्ताफ शेख म्हणाला की, हलाकीची परिस्थितीत शिक्षण घेत होते. शाळेत असताना भजी व चहा घेऊन जात असत. वडिलांवर कर्ज झाले. मलाही लोक हिणवू लागले. त्यामुळे आम्ही काटेवाडीसोडून इस्लामपूर येथे गेलो. तिथे शाळा शिकलो आईने कितेक वेळा मंगळसूत्र गहाण ठेऊन पैसे दिले. त्यानंतर मी पुन्हा बारामती येथे राष्ट्रवादीने चालविलेल्या ऍकॅडमीत आलो व तिथे समीर मुलाणी यांनी मोलाची साथ दिली. तिथेच खऱ्या अर्थाने पुढील शिक्षणाचा पाया रचला गेला. त्यात सुनेत्रा पवार व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माझी पुणे येथील बारामती हॉस्टेलवर राहणायची व खाण्याची सोय केली. त्यामुळेच बळ मिळत होते. माझे चुलत्यांनी कर्ज करूनही मला पैसे पुरविले. याची जाणीव मला कायम होती, त्यामुळेच आज माझ्या आयुष्यातील ध्येय पूर्ण करू शकलो. तसेच इतर मुलांनाही हार न मानता झगडण्याची जिद्द बाळगा यश हे मिळतेच, असे त्याने नमूद केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)