सहकाऱ्याकडून तरुणीचा विनयभंग

पिंपरी – औषधांच्या दुकानात काम करणाऱ्या तरुणीचा विनयभंग कऱणाऱ्या सहकाऱ्यावर हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी 24 वर्षीय तरूणीने फिर्याद दिली असून सचिन छाजेड (वय-45 रा.कोंढवा, पुणे) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडिता ही एका औषधाच्या दुकानात काम करते. तेथे छाजेड हा देखील कामाला आहे. छाजेड हा सतत कामाच्या बहाण्याने फिर्यादीला स्पर्श कऱण्याचा प्रयत्न करत होता. त्याच्या या त्रासाला कंटाळून फिर्यादी तरुणीने हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार केली असून हिंजवडी पोलीस पुढील तपास करीत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)