सहकार हे आश्वासनावर नाही तर विश्वासावर चालते – कांतीलाल गुजर

पिंपरी – सहकार ही जनसामान्यांच्या जिव्हाळ्याची गोष्ट बनली आहे. सहकार हे आश्वासनावर चालत नाही तर ते विश्वासावर चालते. सहकारी संस्था टिकल्या पाहिजेत, वाढल्या पाहिजेत, जगल्या पाहिजेत. सहकारात काम करीत असलेल्या सहकारी बॅंका, पतसंस्थांनी आपली विश्वासार्हता जपली पाहिजे, असे मत प्रेरणा बॅंकेचे अध्यक्ष कांतीलाल गुजर यांनी व्यक्त केले.

प्रेरणा पतसंस्थेच्या नूतन कार्यालय व विविध कार्यक्रमाच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थापक तुकाराम गुजर होते. नगरसेविका झामाबाई बारणे, प्रेरणा बॅंकेचे उपाध्यक्ष संतोष मुंगसे, ज्येष्ठ संचालक श्रीधर वाल्हेकर, गबाजी वाकडकर, लक्ष्मण काटे, अंकुश पऱ्हाड, सुरेश पारखी, संजय पठारे, चंद्रभागा भिसे, पतसंस्थेच्या अध्यक्षा शालिनी गुजर, उपाध्यक्ष सोमनाथ गुजर, प्रेरणा शिक्षण संस्थेचे प्रशासन अधिकारी विलास दसाडे, बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तानाजी सोनवणे, स्वीकृत सदस्य संदीप गाडे, काळुराम बारणे आदी उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यानिमित्त प्रेरणा शिक्षण संस्थेत विद्यार्थ्यांचा आनंद मेळावा भरविण्यात आला होता. शालेय विद्यार्थ्यांनी खाऊ गल्ली आणि विविध खेळांचे स्टॉल मांडले होते. विद्यार्थी वशिक्षकांनी त्याचा मनमुराद आनंद लुटला. चित्रकला प्रदर्शन, मेहंदी स्पर्धा देखील आयोजित करण्यात आली होती. प्रेरणा बॅंकेच्या रावेत येथील शाखेचाही वर्धापन दिन साजरा करण्यात आला. थेरगाव येथील मुख्य शाखेत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. अंकुश पऱ्हाड यांनी स्वागत केले. नाना शिवले यांनी प्रास्ताविक केले. गौतम दळवी यांनी सूत्रसंचालन केले. सोमनाथ गुजर यांनी आभार मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)