“सहकार महर्षी’त 2 लाख 1 व्या साखर पोत्याचे पूजन

33 मेगावट क्षमतेच्या सहवीजनिर्मिती प्रकल्पामधून 1 कोटी वीज विक्री

अकलूज- शंकरनगर येथील सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखान्याच्या चालू गळीत हंगामात उत्पादित झालेल्या 2 लाख 1 व्या साखर पोत्याचे पूजन कारखान्याचे संचालक रावसाहेब पराडे-पाटील यांच्या हस्ते, तसेच बगॅसवर आधारित 33 मेगावट क्षमतेच्या सहवीजनिर्मिती प्रकल्पामधून आत्तापर्यंत एक्‍स्पोर्ट केलेल्या 1 कोटी वीज युनिटचे पूजन कारखान्याचे संचालक भारत फुले यांच्या हस्ते करण्यात आले.
कारखान्याचा सिझन 2018-19 चा ऊस गळीत हंगाम दिनांक 22 ऑक्‍टोबर 2018 रोजी सुरू झाला असून, दिनांक 20/11/2018 अखेर 2 लाख 19 हजार 632 मे. टन ऊसाचे गाळप होऊन 2 लाख 18 हजार 250 साखर पोत्याचे उत्पादन झालेले असून, सरासरी साखर उतारा 11.01 टक्के आणि आजचा साखर उतारा 10.22 टक्के आहे. सध्या प्रति दिन 8 हजार मे. टनापेक्षा अधिक उसाचे गाळप होत आहे.
को-जनरेशन प्रकल्पामध्ये दिनांक 22 ऑक्‍टोबर 2018 पासून आजपर्यंत 1 कोटी 78 लाख
87 हजार 564 युनीट वीज निर्माण होऊन 1 कोटी 3 लाख 46 हजार 692 युनीट वीज विक्री केलेली आहे. चालू हंगामामध्ये उपपदार्थ प्रकल्पातील डिस्टीलरीमध्ये दिनांक 15 लाख 19 हजार 711 लिटर्स रेक्‍टिफाईड स्पिरीट उत्पादन झाले आहे. सिटिक ऍसिड प्रकल्पामध्ये 165 मे. टन ऑसिटाल्डिहाईड आणि 236 मे. टन ऑसिटिक ऍसिडची निर्मिती झाली आहे. खासदार विजयसिंह मोहिते-पाटील आणि चेअरमन जयसिंह मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत असल्याची माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक राजेंद्र चौगुले यांनी दिली.
साखर पोती आणि वीज युनिट पूजनाचे कार्यक्रमास कारखान्याचे विद्यमान संचालक, लक्ष्मण शिंदे, विजय माने-देशमुख, इतर मान्यवर विनायक केचे, धनंजय दुपडे, अनिलराव कोकाटे, रामचंद्र ठवरे, नामदेव चव्हाण, नितीनराजे निंबाळकर, चंद्रशेखर दुरापे, मारुती घोडके, कारखान्याचे सभासद, सर्व विभाग प्रमुख, कामगार युनियन प्रतिनिधी आणि कर्मचारी उपस्थित होते.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)