सहकार महर्षीत हंगामाची सांगता

अकलूज- राज्यात सहकारी कारखानदारी क्षेत्रात लौकिक असलेल्या सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखाना लि., शंकरनगर येथे 2017-18 च्या गळीत हंगामाचा सांगता समारंभ चेअरमन जयसिंह मोहिते-पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. कारखान्याचे मार्गदर्शक, संचालक खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या आणि चेअरमन जयसिंह मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याने हा हंगाम अतिशय यशस्वीपणे पार पाडला असून, याकामी कारखान्याचे सर्व अधिकारी, कामगार, तसेच वाहनधारक टोळकरी आणि शेतकरी सभासदांचे बहुमोल सहकार्य मिळाल्याने संचालक शंकरराव माने-देशमुख यांनी सर्वांचे आभार मानले आणि त्यांचा सत्कार करण्यात आला.
सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याच्या चालू गळीत हंगाम सुरू होऊन रविवारी (दि. 25) अखेर 11 लाख 12 हजार 531 मेट्रिक टन उसाचे गाळप करीत 12 लाख 76 हजार 350 साखर पोत्यांचे उत्पादन झाले. कारखान्यातील डिस्टिलरीमध्ये आतापर्यंत 91 लाख 58 हजार 28 लिटर्स रेक्‍टिफाईड स्पिरीट आणि 2 लाख 54 हजार;149 लिटर्स एक्‍स्ट्रा न्युट्रल अल्कोहोल असे 94 लाख 12 हजार 177 लिटर्स उत्पादन झाले आहे, याबरोबरच 45 लाख 60 हजार लिटर्स इथेनॉल उत्पादन झाले आहे. सिटिक सिड प्रकल्पात 1224 मेट्रिक टन सिटाल्डीहाईडची आणि 1004 मेट्रिक टन सिटिक सिडची निर्मिती झाली आहे. प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत असल्याची माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक राजेंद्र यादव यांनी दिली.
हंगामाच्या सांगता समारंभानिमित्त ऊसतोडणी वाहतुकीवरील ट्रॅक्‍टर मालक पांडुरंग जाधव आणि त्यांच्या पत्नी उषादेवी या उभयतांच्या हस्ते श्री सत्यनारायण महापूजा करणेत आली. यावेळी संचालक विजयकुमार माने-देशमुख, धर्माजी थिटे,मोहन लोंढे, रावसाहेब मगर, सुरेश पाटील, भीमराव काळे, नामदेव चव्हाण, राजेंद्र मोहिते, सतीश शेंडगे, कामगार नेते बाळासाहेब सावंत, निवृत्ती आगम, नितीन बेनकर आदी अधिकारी आणि कर्मचारी वर्ग उपस्थित होते. सर्वांचे स्वागत सेक्रेटरी अभयसिंह माने-देशमुख यांनी केले. शेतकी अधिकारी ए. वी. गुळुमकर व आर. ए. जावळे यांनी सर्व मान्यवरांचे आभार मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)