सहकार महर्षीच्या 8 लाख 1 व्या साखर पोत्याचे पूजन

चार कोटी वीज विक्री ः प्रतिदिन 8 हजार मेट्रिक टनापेक्षा अधिक उसाचे गाळप

अकलूज- येथील सहकार महर्षी साखर कारखान्याच्या 2018-19 च्या गळीत हंगामात उत्पादित झालेल्या 8 लाख 1 व्या साखर पोत्याचे पूजन संचालक विश्वासराव काळकुटे यांच्या हस्ते, तसेच सहवीज निर्मिती प्रकल्पामधून निर्यात केलेल्या चार कोटी वीज युनिटचे पूजन संचालिका माधुरी लोंढे यांचे हस्ते करण्यात आले.
सहकार महर्षी कारखान्याचे मार्गदर्शक संचालक खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अध्यक्ष जयसिंह मोहिते-पाटील यांच्या नेतृत्वाखाली कारखाना प्रगतीपथावर घौडदौड करीत असल्याचे कार्यकारी संचालक राजेंद्र चौगुले यांनी सांगितले. कारखान्याचा 2018-19 चा ऊस गळीत हंगाम 22 ऑक्‍टोबर 2018 रोजी सुरू झाला असून, 27 जानेवारी अखेर 7 लाख 72 हजार 965 मेट्रिक टन उसाचे गाळप होऊन 8 लाख 39 हजार 600 साखर पोत्याचे उत्पादन झालेले असून, साखर उतारा 11.43 टक्के आहे. सध्या प्रति दिन 8 हजार मेट्रिक टनापेक्षा अधिक उसाचे गाळप होत आहेको-जनरेशन प्रकल्पामध्ये आजअखेर 6 कोटी 72 लाख 40 हजार 048 युनिट वीज निर्माण होऊन 4 कोटी 7 लाख 45 हजार 805 युनिट वीज एक्‍स्पोर्ट (विक्री) केलेली आहे.
या कार्यक्रमास कारखान्याचे संचालक नामदेव ठवरे, धनंजय चव्हाण, विजयकुमार माने-देशमुख, राजेंद्र मोहिते, रावसाहेब पराडे, कमल जोरवर, मारुती घोडके, कामगार नेते बाळासाहेब सावंत, संदिपान चव्हाण, विनायक केचे, अनिलराव कोकाटे, खरेदी-विक्री संघाचे व्हाईस चेअरमन नितीनराजे निंबाळकर, भाऊसाहेब जाधव, कारखान्याचे सिडीक सीड प्रकल्प इन्जार्ज एस. एम. देशमुख, प्रशासकीय अधिकारी अभयसिंह माने-देशमुख, तसेच सभासद, सर्व खातेप्रमुख, विभाग प्रमुख युनियन प्रतिनिधी आमि कर्मचारी उपस्थित होते. सर्वांचे स्वागत संगणक प्रमुख बी. जी. किर्दकर आमि आर. जे. जगदाळे यांनी केले, तर इंजिनिअर बी. के. मगर आणि इलेक्‍ट्रिक इंजिनिअर व्हि. ए. सिंहासने यांनी आभार मानले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)