सहकार महर्षिच्या 5 कोटी वीज विक्री केलेल्या युनिटचे पूजन

अकलूज- शंकरनगर येथील सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखान्याच्या 33 मेगावॅट क्षमतेच्या सहवीज निर्मिती प्रकल्पामधून आत्तापर्यंत एक्‍स्पोर्ट केलेल्या 5 कोटी वीज युनिटचे पूजन कारखान्याचे संचालक सतीश शेंडगे यांच्या हस्ते करण्यांत आले. खासदार
विजयसिंह शंकरराव मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व अध्यक्ष जयसिंह मोहिते-पाटील यांचे नेतृत्वाखाली कारखाना प्रगतीपथावर वाटचाल करीत आहे. तसेच कारखान्याचा 2018-2019 च्या को-जनरेशन प्रकल्पामध्ये दिनांक 22 ऑक्‍टोबर 2018 पासून गुरुवार (दि. 21) अखेर 8 कोटी 51 लाख 88 हजार 570 युनीट वीज निर्माण होऊन 5 कोटी 17 लाख 29 हजार 565 युनीट वीज विक्री केलेली आहे. तसेच डिस्टीलरीमध्ये दि. 27 जानेवारी 2019 अखेर 82 लाख 93 हजार 973 लिटर रेक्‍टिफाईड स्पिरीट तसेच 33 लाख 35 हजार 191 लिटर इथेनॉल उत्पादन झाले आहे. तसेच ऍसिटीक ऍसिड प्रकल्पामध्ये 1311 मे.टन ऍसिटाल्डी हाईड व 734 मे.टन ऍसिटीक ऍसिडची निर्मिती झाली आहे, अशी माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक आर.के. चौगुले यांनी दिली. या वीज विक्री युनिट पूजनाचे कार्यक्रमास कारखान्याचे उपाध्यक्ष प्रकाश पाटील तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी उपस्थितांचे स्वागत बी. वाय. पवार यांनी केले व त्यांचा सत्कार ए. बी. कदम यांनी केला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)