सहकार महर्षिच्या पुण्यतिथीनिमित्त निरंकारी सत्संग

अकलूज – या जगामध्ये मानवतेच्या कल्याणचा हेतू घेवूनच साधूसंत धरतीवर अवतरत असतात. सहकार महर्षिच्या पुण्यतिथी निमित्त सत्संग सोहळ्याचे आयोजन करुन जनसेवा संघटनेने मानवतावादी कार्य साध्य होत आहे, असे प्रतिपादन निरंकारी मिशनचे प्रचारक सुभेदार जाधवजी यांनी केले. अकलूज येथील विजय चौकात सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील यांच्या 39 व्या पुण्यतिथीनिमित्त सहकार महर्षि पुण्यतिथी समारंभ समिती, महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटना व संत निरंकारी मंडळ अकलूज शाखेच्या संयुक्त विद्यमाने डॉं.धवलसिंह मोहिते-पाटील यांनी भव्य निरंकारी सत्संगाचे आयोजन केले होते.

यावेळी डॉ.धवलसिंह मोहिते-पाटील, पदमजादेवी मोहिते-पाटील, उर्वशीराजे मोहिते-पाटील,माणिकराव मिसाळ, आण्णा इनामदार, आण्णासो शिंदे, शंकरराव मोहिते-पाटील सहकारी बॅंकेचे चेअरमन सतिशनाना पालकर, रास्ते आदी मान्यवर उपस्थित होते.

-Ads-

यावेळी सत्संग प्रवचनादरम्यान बोलताना सुभेदार जाधवजी म्हणाले की मनुष्य जन्म हा आनमोल असला तरी तो नाशवंत आहे. परमेश्वराची प्राप्ती करुन भक्ती करण्यासाठी हा जन्म मिळाला आहे. नाशवंत शरीराच्या मोहात अडकण्यापेक्षा शरीराला चालवणाऱ्या शाश्वत इश्वरीय शक्तीच्या भक्तीत रमावे. सृष्टीचे पालन पोषण करणारा एक परमात्मा असून सदगुरुकडूनच त्याची जाण होते. निरंकारी मिशनच्या माध्यमातून सदगुरु सविंदर हरदेवसिंहजी महाराज या समस्त मानवाला एका परमात्मा शक्तीची ओळख करुन देवुन सर्व मनुष्यामध्ये एकत्वाचे नाते निर्माण करीत आहेत.

यावेळी डॉ.धवलसिंह मोहिते-पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सोलापुर, पुणे व मुबई जिल्ह्यातील विविध भागातून आलेल्या निरंकारी भाविकांनी भक्तीगीत व अभंग सादर केले.

शाखा मुख्य साळवे गुरुजी यांनी उपस्थिताचे स्वागत केले. तर सूत्रसंचलन शिलवंत क्षीरसागर व नागेश लोंढे यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी निरंकारी मंडळाचे सेवादल युनिट 825 चे संचालक विनायक माने, शिक्षक दिलीप कांबळे, मेघा ठोंबरे, लालासाहेब अडगळे सर्व सेवादल तसेच जनसेवा हातगाडी संघटनेचे दीपक सुत्रावे, पिंटू वैंद्य, राहूल माने आदीनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमासाठी सोलापुर, पुणे व मुबई आदीसह विविध भागातून बहुसंख्य निरंकारी अनुयांयी उपस्थित होते.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)