चोराच्या हाती तिजोरीच्या चाव्या ! राजू शेट्टींचे सहकार मंत्र्यांवर टीकास्त्र

पुणे : खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे पुण्यातील अलका चाैकापासून ते साखर संकुल पर्यंत पायी भव्य माेर्चा काढण्यात आला. दरम्यान राज्यभरातील शेतकरी सहभागी झाले आहेत.

शेतकऱ्यांनी कारखान्यांना ऊस विकला असून अनेक कारखान्यांकडून त्यांना अद्याप एफआरपीचा एक रुपया सुद्धा दिला नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला आहे. एफआरपी न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांचे लाखाे रुपये कारखान्यांमध्ये अडकून पडले आहेत. त्यामुळे लवकरात लवकर ऊसाची एफआरपी मिळावी, अशी मागणी मोर्चाच्या वतीने करण्यात आली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान खासदार राजू शेट्टी यांनी बोलताना सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्यावरही जोरदार टीकास्त्र सोडले.   सहकार मंत्री भामटा आणि चोर असून या चोराच्या हाती तिजोरीच्या चाव्या आहेत, असा निशाणा त्यांनी साधला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)