सहकार पॅनेल उमेदवारांकडून मतदारांच्या गाठीभेटी

पुणे – दि महाराष्ट्र स्टेट को-ऑप. हौसिंग फायनान्स कार्पोरेशन लि., मुंबई या संस्थेची पंचवार्षिक निवडणूक (2018 ते 2023) जाहीर झाली आहे. या संस्थेच्या निवडणुकीसाठी मुंबई जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष आमदार प्रविण दरेकर व बाळासाहेब सानप, वसंत गिते, शिवाजीराव नलवडे, सतिश पाटील या मातब्बर नेत्यांच्या नेतृत्वाखाली सहकार पॅनेलची स्थापना करण्यात आली आहे.

या निवडणुकीसाठी मतदारांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात झाली असून आमदार दरेकर यांनी गुरुवारी मतदारांची भेट घेतली. आमदार दरेकर यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली असून या निवडणुकीमध्ये चुरस वाढली आहे. सहकार पॅनेलची निशानी कपबशी आहे. या पॅनलच्या अनुसूचित जाती / जमाती प्रवर्गातून निशा विजय सोनवणे तर इतर मागासवर्गीय प्रवर्गातून वसंतराव पंढरीनाथ तोरवणे, महिला राखीव मतदार संघातून स्नेहा शिरीष अंबरे व संजीवनी संजयराव सिरोदे हे निवडणूक लढवत आहेत. या निवडणुकीसाठी येत्या 1 जुलैला शिवाजीनगर येथील साखर संकुल येथे सकाळी 9 ते सायंकाळी 5 यावेळेत मतदान होणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)