सहकारी संस्था शेतकऱ्यांच्या भाग्यविधाता

राज्यमंत्री गुलाबराव पाटील : चिंबळी येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन

चिंबळी- समाजाची गरज जे नेहमी भागवितात तेच मोठा होतात. सहकारी संस्थाही समाजाची विकासाची वाहिनी म्हणून समजली जाते. तसेच सहकारी संस्था या शेतकऱ्यांच्या भाग्यविधाता असल्याचे मत सहकार राज्यमंत्री गुलाब पाटील यांनी कुरुळी (ता. खेड) येथे व्यक्‍त केले.
चिंबळी येथे आमदार सुरेश गोरे यांच्या विशेष प्रयत्नांतून मंजुर झालेली चिंबळीफाटा ते केळगाव-आळंदी रत्स्त्याच्या दुरूस्तीची कामाचे भूमिपूजन व शिवसेना शाखेच्या नामफलकाचे अनावरण सहकार राज्यमंत्री गुलाब पाटील व खासदार शिवाजी आढळराव पाटील यांच्या हस्ते बुधवारी (दि. 21) करण्यात आले. त्यानंतर कुरुळी येथे झालेल्या सभेत पाटील बोलत होते. याप्रसंगी आमदार सुरेश गोरे, चिंबळीचे माजी सरपंच पांडुरंग बनकर, शिवसेना जिल्हा प्रमुख राम गावडे, पंचायत समितीचे सदस्य अमर कांबळे, उपसभापती भगवान पोखरकर, विभाग प्रमुख अमोल विरकर, नंदकुमार मुंगसे, अकुंश राक्षे, ग्रामपंचायतीचे सदस्य आप्पासाहेब बटवाल, खंडू पाटारे, काळूराम बनकर, दत्तात्रय गवारे, शंकर जैद, विजय जगनाडे, पंडित कातोरे, विश्‍वास बर्गे, शिवाजी कड आदी उपस्थित होते. दरम्यान, कुरुळी येथील विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेच्या शताब्दी महोत्सवानिमित्त गुलाबराव पाटील यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून दिपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी खरेदी-विक्री संघाचे व्यवस्थापक नाना टाकळकर, गणेश सांडभोर, सुरेश गायकवाड, संजिवनी सोनवणे, विजय शिंदे, नंदा कड, पोलीस पाटील प्रतिभा कांबळे, मारुती मुऱ्हे, अनिल लोखंडे, एकनाथ कर्पे, संस्थेचे सचिव चंदन पानसरे उपस्थित होते. दरम्यान, मान्यवरांच्या हस्ते कुरुळी येथील संस्थेच्या सर्व आजी-माजी अध्यक्ष-उपाअध्यक्ष तसेच सचालंकाना सन्मानचिन्ह देऊन गुणगौरव करण्यात आला. याप्रसंगी माजी उपसरपंच आशिष मुऱ्हे, नितीन गायकवाड व ग्रामस्थ उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक माजी उपसरपंच चंदन मुऱ्हेवस्ती तर अमर कांबळे यांनी आभार मानले.

  • खेड येथील घाटाचे काम, नारायणगाव येथील बायपास, पुणे-नाशिक रेल्वेचे काम, तसेच बैलगाडा शर्यती लवकरच सुरू करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे.
    – शिवाजीराव आढळराव पाटील, खासदार

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)