सहकारी महिलेच्या त्रासामुळे आत्महत्या

चिंचवड – बांधकाम उपविभागीय कार्यालयात काम करत असताना सहकारी वरिष्ठ कारकून महिलेकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून कनिष्ठ कारकुनाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना चिंचवड येथे घडली. हा प्रकार 22 मार्च 2018 रोजी सकाळी दहा वाजता वाल्हेकरवाडी येथे घडला.

अशोक रमेश कांबळे (वय-24, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) असे आत्महत्या केलेल्या कनिष्ठ कारकुनाचे नाव आहे. याप्रकरणी संगिता विष्णू जायभाय (वय 44, रा. घोरपडी) या वरिष्ठ कारकून महिलेविरूद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कांबळे यांच्या पत्नी अमृता कांबळे (वय-29) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

-Ads-

अशोक कांबळे हे पुणे बांधकाम उपविभागीय कार्यालयात कनिष्ठ कारकून म्हणून 2015 पासून कामास होते. या ठिकाणी काम करत असताना सहकारी असणाछया वरिष्ठ कारकुन जायभाय या नेहमीच त्यांचे काम अशोक कांबळे यांना करण्यास सांगत असत. तसेच कामात काही चुका झाल्यास कार्यालयातील इतर सर्व कर्मचाऱ्यांसमोर कांबळे यांना घालून पाडून बोलत असे. त्यांचा अपमान करून वेळोवेळी मानसिक त्रास देत असत. या त्रासाला कंटाळून कांबळे यांनी राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. सहायक पोलीस निरीक्षक सपना देवतळे तपास करत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)