सहकारी कारखाना बुडतो आणि खासगी बुडवतोय

File Photo

सहकार महर्षी चंदरराव तावरे; सरकारी नियमांच्या कचाट्यात साखर उद्योग

प्रमोद ठोंबरे
बारामती- शेतकऱ्यांना एफआरपी पेक्षा जास्त पैसे दिल्यास इन्कमटॅक्‍सच्या नोटीसा येतात. मात्र, हाच न्याय खासगी साखर कारखान्यांना का नाही. बरेच खासगी साखर कारखाने आयकर आणि विक्रीकर बुडवतात. त्यामुळे सरकारचा महसूल बुडतो. खर्च वजा जाता उरलेली रक्क्‌म ही सभासद शेतकऱ्यांना वाटून मिळायला पाहिजे हा सहकाराचा नियम आहे तर खासगीत एकाच मालकाला अवाढव्य नफा. यामुळे सहकारी साखर कारखानदारी टिकवायची असेल तर शेतकऱ्यांनीच शहाणे व्हावे, असे सहकार महर्षी व माळेगाव कारखान्याचे ज्येष्ठ संचालक चंदरराव तावरे यांनी सांगितले.
सहकारी साखर कारखानदारी आणि खासगी यांच्यातील अनेक प्रश्‍नांवर “प्रभात’ला दिलेल्या एका विशेष मुलाखतीत तावरे यांनी सडेतोडपणे उत्तरे देत अनेकांच्या डोळ्यात अंजन घालण्याचा प्रयत्न केले. ते म्हणाले की, सरकारकडे सहकारी साखर कारखान्याकडून कर रुपाने पैसा जातो, त्याप्रमाणात सरकारनेही कारखान्यांना सुविधा देण्याची गरज आहे. परंतु, तसे होत नाही. याउलट राज्यातील सहकारी साखर कारखानदारीसमोरच समस्यांच समस्या असून उत्तर प्रदेश व बिहारसारखी परिस्थिती येथे निर्माण होत आहे. या राज्यांमध्ये ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर कारखानदार यांच्यामध्ये दलाल तयार झालेले आहेत. हे दलाल आपली भरभक्क्‌म कमाई करुन शेतकऱ्यांची गळचेपी करतात, त्याचप्रमाणे एफआरपी रक्क्‌म न देण्यासाठी हा पर्याय काढला जात असल्याने साखर कारखान्यांच्या माध्यमातून सहकारच दलालांच्या हाती जाण्याची भिती आहे. याकरिता ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी वेळीच जागे होण्याची गरज आहे. अन्यथा, ऊस उत्पादक शेतकरी भिकेला लागल्याशिवाय राहणार नाहीत.
पुणे जिल्ह्यात 14 साखर कारखाने असून 7 साखर कारखाने सहकारी तर 7 खासगी आहेत. सहकारी कारखान्यात चुकीचे व्यवहार होत आहेत. शेतकऱ्यांचा पैसा लुबाडला जात आहे. सगळे कळत असुनही वळत नाही. हे थांबवायचे असेल तर सर्वच साखर कारखान्यांचे लेखा परिक्षण कडक स्वरुपात केले जाऊन दोषी असणाऱ्यांवर कडक शिक्षेची तरतूद करण्याची नितांत गरज असल्याकडेही तावरे यांनी लक्ष वेधले.
आजच्या स्थितीत शेतकरी व्यापारी होत आहेत, ही चांगली बाब आहे. सध्याच्या स्थितीती ऊस तोडणी कामगारांचा गंभीर प्रश्‍न तयार झाला असून ऊस तोडणी कामगार मोटार सायकलवर ऊस तोडायला जातात. टोळ्यांना पैसे दिल्यानंतर बऱ्याचदा पैसे बुडण्याचा धोकाही निर्माण झाला आहे. त्यामुळे सहकारी साखर कारखानदारांना आधुनिक तंत्रज्ञान स्विकारावे लागणार आहे.

  • खोट्या धंद्यापासून सावधान…
    एका शेतकऱ्याने ऊसाचे वजन वजनकाट्यावर केले असता 29 टन ऊस भरला; नंतर सदर ट्रॅक्‍टर फलटण तालुक्‍यातील एका खासगी साखर कारखान्यात नेला असता या शेतकऱ्याला 24 टन ऊस असल्याची पावती दिली गेल्याने शेतकऱ्याला मानसिक धक्का बसला. त्याही पुढे धक्कादायक बाब म्हणजे मुंबईतील एका कंपनीने वजनमापाची चीप बनविली आहे. या चीपनुसार वजन कमी जास्त करता येते. सर्वसाधारणत: रिमोट कंट्रोलद्वारे दोन कि.मी. अंतरावरूनही ऊसाचे वजन कमी लावता येते, अशा खोट्या धंद्याचे प्रयोग सुरु आहेत. या गोष्टी अभ्यासल्या तर सहकारी साखर कारखानदारी आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यावर हे मोठे संकट आहे.
  • बारामतीतील कारखान्यांची अवस्था…
    माळेगाव कारखान्याचे वाटोळे आम्ही होऊ दिलेले नाही. शेजारच्याच छत्रपती कारखान्याची अवस्था अत्यंत बिकट आहे. तर, सोमेश्वर कारखान्याने गेल्या तीन वर्षात ऊस उत्पादकांना दोन हजार रुपये कमी दिले आहेत. फलटण तालुक्‍यात श्रीराम सहकारी साखर कारखाना व खासगी साखर कारखाना असे दोनच कारखाने आहेत त्यामुळे येथील शेतकरी माळेगावकडे धाव घेतात. अशी स्थिती का तर, संचालक केवळ पुढारपण करतात. अशा, गाव पुढाऱ्यांची निष्क्रियता शिक्षीत पिढीमुळे उघड होत असून केवळ पोकळ पदे दिली म्हणून काहीजण भूलतातच, यातूनच बारामतीतील कारखान्यांचीही अवस्था अशी झाली असल्याचा टोला चंदरराव तावरे यांनी लगावला.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
48 :thumbsup:
5 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
8 :blush:
2 :cry:
1 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)