सहकारातील स्पर्धा टिकवण्यासाठी सामुहिक प्रयत्नांची गरज

आ. शशिकांत शिंदे यांचे प्रतिपादन

कुडाळ, दि. 18 (प्रतिनिधी) – आजच्या स्पर्धात्मक आणि कसोटीच्या काळात अर्थनीतीच्या संकल्पना बदलत असून त्यातून चांगली विकासात्मक फळे मिळवण्यासाठी सजग राहणे गरजेचे आहे, त्यासाठी जाणीवपूर्वक लक्ष देण्याची व निकोप स्पर्धा टिकवण्यासाठी सामुहिक प्रयत्नांचीही गरज आहे. सोसायटीचे चेअरमन राजेंद्र शिंदे यांनी निस्वार्थीपणे सर्वसामान्य जनतेला सदैव सहकार्य केले.राजकीय अभिनियवेश बाजुला ठेवून समोर आलेल्या व्यक्तीला विश्वासाने मदतीचा हात दिला म्हणूनच त्यांनी जनतेच्या हृदयात स्थान मिळवले असल्याचे गौरवोद्‌गार आ. शशिकांत शिंदे यांनी बोलताना काढले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

जावली-महाबळेश्वर शेती उत्पन्न बाजार समितीचे सभापती व कुडाळ वि.का.स. सेवा सोसायटीचे चेअरमन राजेंद्र शिंदे यांच्या सत्कार सोहळ्याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. शशिकांत शिंदे म्हणाले, सहकारी संस्थांमधील व्यवस्थापन कौशल्य आणि आधुनिकता यांची जाणीव विकसित करणे गरजेचे झाले आहे.

आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, सहकार क्षेत्रात उत्तमपणे आणि दिशादर्शक काम करणाऱ्या ज्या संस्था आहेत, त्यात कुडाळ विकास सेवा सोसायटीचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल, सोसायटीच्या माध्यमातून चेअरमन राजेंद्र शिंदे यांनी शेतकऱ्यांसाठी लोकाभिमुख काम करून एक आदर्श निर्माण केलेला आहे त्यांचे कार्य शेतकऱ्यांच्या हिताचे आहे.
यावेळी राजेंद्र शिंदे यांना सहकार क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी शिंदेशाही पगडी व सन्मान पत्र देऊन त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला.

यावेळी माजी आ. सदाशिव सपकाळ, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, प्रभारी सभापती दत्ता गावडे, माजी सभापती सुहास गिरी, पंचायत समिती सदस्य सौरभ शिंदे, प्रतापगड साखर कारखान्याचे संचालक मालोजीराव शिंदे, माथाडी कामगार नेते ऋषिकांत शिंदे, किसनवीर कारखाना संचालक चंद्रसेन शिंदे, सरपंच वीरेंद्र शिंदे, रविंद्र परामणे यांच्यासह कुडाळ सोसायटीचे सर्व संचालक, मान्यवर उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)