सहकारमहर्षी सुवालाल गुंदेचा जैन ओसवाल पतसंस्थेस एक कोटी 5 लाखांचा नफा

नगर – सहकारमहर्षी सुवालाल गुंदेचा जैन ओसवाल नागरी पतसंस्थेस सन 2017-18 या आर्थिक वर्षात 1 कोटी 5 लाखांचा निव्वळ नफा झाला आहे. उत्कृष्ट आर्थिक कामगिरीची परंपरा कायम राखत संस्थेने मागील आर्थिक वर्षातही ग्राहकांना सर्वोत्कृष्ट सेवा दिली आहे. पतसंस्था स्थापनेपासून नफा कमावत असून सभासदांना सातत्याने 15 टक्के लाभांश देण्यात येत आहे, अशी माहिती पतसंस्थेचे अध्यक्ष मनोज गुंदेचा व उपाध्यक्ष ईश्‍वर बोरा यांनी दिली.
सहकारमहर्षी सुवालाल गुंदेचा यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या जैन ओसवाल पतसंस्थेने शहाजी रोडवरील मुख्य शाखा तसेच मार्केट यार्ड येथील शाखेच्यामार्फत अत्याधुनिक बॅकिंग सेवा देण्यावर भर दिला आहे. पतसंस्थेचे वसुल भाग भांडवल 1 कोटी 37 लाख रुपये आहे. सभासद संख्या 6 हजार 781 इतकी असून स्वनिधी 3 कोटी 46 लाख रुपये आहे. पतसंस्थेत एकूण ठेवी 33 कोटी 33 लाख रुपये असून कर्ज वाटप 26 कोटी 14 लाख रुपये आहे. खेळते भागभांडवल 40 कोटी 37 लाख रुपये आहे. तसेच पतसंस्थेने एनपीएची तरतूद 1 कोटी 55 लाख रुपये केली आहे. मागील आर्थिक वर्षात सर्व तरतुदी वजा जाता संस्थेला 1 कोटी 5 लाखांचा भरीव निव्वळ नफा झाला आहे.
पतसंस्थेच्या दोन शाखा मधून आरटीजीएस, एनईएफटी, लाईट बिल भरणा, डिमांड ड्राफ्ट या सुविधा देण्यात येतात. याशिवाय नॅशनलाईज बॅंकेमार्फत विविध शासकीय कर भरणा ई चलनद्वारे ऑनलाइन स्विकारण्याचीही सुविधा देण्यात येत आहे. पतसंस्थेकडून दहा मिनिटात सोने तारण कर्ज, दुचाकी वाहन कर्ज देण्यात येते. याशिवाय वेअर हाऊस कर्ज, शेअर तारण कर्जही उपलब्ध करून देण्यात येते. मागील पाच वर्षापासून संस्थेला ऑडिट अ वर्ग मिळत आहे. सभासदांसाठी एक लाख रुपयांचा अपघाती विमा योजनाही राबविण्यात येते. सर्व संचालक, सभासद, ठेवीदार, अधिकारी, कर्मचारी यांच्या एकत्रित प्रयत्नातून पतसंस्थेची घोडदौड सुरू आहे. नोटाबंदीनंतरच्या काळात आलेल्या मंदीतही सर्व ग्राहकांनी पतसंस्थेवरील विश्‍वास कायम ठेवत सेवा करण्याची संधी दिली. प्रभावी कर्जवसुलीसाठी सर्व संचालक, अधिकारी, कर्मचारी एकत्रित काम करीत असतात. यासाठी संस्थेचे संचालक समीर बोरा, संतोष गांधी, किरण शिंगी, शैलेश गांधी, अभय पितळे, शांतीलाल गुगळे, सुवर्णा डागा, राखी मुनोत, तुळशीदास कांबळे, पंडितराव खरपुडे, विनय भांड, सी.ए.विशाल गांधी, सर व्यवस्थापक प्रशांत भंडारी यांचे योगदान लाभत असते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)