सहकारनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील दोन सराईत एक वर्षासाठी तडीपार

पुणे – सहकारनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील दोन सराईतांना परिमंडळ दोनच्या पोलिसांनी पुणे शहर आणि जिल्हातून एक वर्षासाठी तडीपार केले आहे. उपायुक्त डॉ. प्रवीण मुंढे यांनी याबाबतचा आदेश नुकताच काढला आहे.
शुभम संजय धोत्रे (वय 21) आणि अक्षय सुनील सातपुते (वय 10) अशी त्या दोघांची नावे आहेत. दोघेही संभाजीनगर, धनकवडी भागात राहणारे आहेत. दोघांवर घातक शस्त्र जवळ बाळगणे, घातक शस्त्राने गंभीर दुखापत करणे, बेकायदेशीर जमावात सामील होणे, प्राणघातक शस्त्रानिशी सज्ज होऊन दंगा करणे, सामाईक इरादा, समान हेतू साध्य करण्यासाठी एकत्र येणे, हाताने मारहाण करून शिवीगाळ करणे, अशा विविध कलमानुसार दोघांवर सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. त्यांची त्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत दहशत असल्याने दोघांना एक वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)