सहकारनगर झोपडपट्टीत गटारे नसल्याने सांडपाणी रस्त्यावर

यवतमध्ये मूलभूत सुविधा देण्याबाबत नागरिकांची मागणी

यवत- यवत (ता. दौंड) येथील सहकारनगर, इंदिरानगर, स्टेशन रोड या झोपडपट्ट्या शासकीय जागेवर ग्रामीण भागातील अतिक्रमण म्हणून गेली 25 ते 30 वर्षांपासून ताबा, वहिवाट, कबजेदार आणि भोगवटादार म्हणून असल्याचे सबळ पुरावे असल्यामुळे महाराष्ट्र शासन ग्रामीण विकास विभागामार्फत (दि. 16 फेब्रुवारी 2018) च्या धोरणानुसार हे अतिक्रमण नियमानुकूल करून पक्की घरे उपलब्ध करून द्यावीत, आरोग्याच्या दृष्टीने मूलभूत सुविधा उपलब्ध करून घ्याव्यात, अशी मागणी दौंड तालुका झोपडपट्टी सुरक्षा दलाचे तालुकाध्यक्ष दत्ता डाडर यांच्यासह आदींनी दौंडचे तहसीलदार बालाजी सोमवंशी व गटविकास अधिकारी गणेश मोरे यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
आरोग्याच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र शासन पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग यांच्या परिपत्रकाद्वारे स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अतिक्रमण यातील शौचालय बांधून देण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार प्रत्येक घर ते शौचालय बांधून देण्यात यावेत. महाराष्ट्र सरकारच्या ग्रामपंचायत नियमान्वये ग्रामपंचायतीला असणाऱ्या हद्दीतील मिळकतीवर आकारणीवर वसुली करण्याबाबत ग्रामविकास व जलसंधारण विभागाकडील (दि.18 जुलै 2016) प्रमाणे प्रत्येक घराप्रमाणे प्रत्येकास नमूना क्रमांक 8 चे उतारे देण्यात यावेत, असे शासनाचे धोरण असताना जाणीवपूर्वक सरकारी निर्णयाची अंमलबजावणी होत नाही. त्यामुळे येथील झोपडपट्टीधारकांचे आरोग्य धोक्‍यात आलेले आहे. यवत येथील सहकारनगर, स्टेशन रोड यासह आदी भागांत मूलभूत सुविधा मिळाव्यात, अशी येथील नागरिकांनी मागणी निवेदन देऊन केली आहे. यावेळी झोपडपट्टी सुरक्षा दलाचे राज्य समन्वयक दत्ता कांबळे, झोपडपट्टी सुरक्षा दलाचे दौंड तालुकाध्यक्ष दत्ता डाडर, सुरेखा भोसले, दत्ता लोंढे, अनिल नागणे, बाबा पवार, भीमराव गवळी, शालम शेख, स्मिता इंगवले, नंदा भोसले, मैनुद्दीन शेख यांच्यासह आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)