सहकारनगरला सदनिका फोडून दागिने लुटले

पुणे – बंद फ्लॅटचे कुलुप उचकटून आत शिरलेल्या चोरट्यांनी कपाटातील पंधरा हजार रुपयांची रोख रक्कम, सोन्याचे आणि हिऱ्याचे दागिने असा पावणेतीन लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. 28 ते 29 जानेवारी या कालावधीत सहकारनगर येथील भाग्यश्री बंगल्यात ही घटना घडली. दत्तवाडी पोलीसांनी याप्रकरणी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

स्वप्निल भोसले (वय 36, रा. सहकारनगर नं. 2) यांनी यासंदर्भात दत्तवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार; भोसले हे काही कामानिमित्त बाहेगरावी गेले होते. त्यावेळी त्यांचे घर बंद असताना चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलुप उचकटून घरात प्रवेश केला. या चोरट्यांनी कपाटातील पंधरा हजार रुपये रोख, सोन्याचे आणि हिऱ्याचे दागिने असा पावणेतीन लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. पोलीस उपनिरीक्षक ए. जी. डफळ अधिक तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)