ससून रूग्णालयातील चांगल्या सेवेची रूग्णांना येत आहे प्रचिती

उरूळीकांचन येथील सामान्य कुटुंबास लाभ

उरुळी कांचन- ससून शासकीय रूग्णालयात कोणत्याही खासगी रूग्णालयापेक्षा चांगली सेवा दिली जात असल्याचा अनुभव ग्रामीण भागातील रूग्णांना येत असून याबाबत चांगल्या प्रतिक्रिया उमटत आहेत. ग्रामीण भागातील लोकांना ससून रूग्णालयात मिळणाऱ्या प्रत्येक सेवेचा लाभ घ्यायला हवा, असे सामाजिक कार्यकर्ते संतोष बोधे यांनी सांगितले.

याबाबतची माहिती अशी की, उरुळी कांचन येथील गर्भवतीस प्रसुतीकरिता खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रसुतीनंतर बाळास काचेच्या पेटीत ठेवण्यात आले, अशा उपचारावर किमान दोन लाख खर्च झाल्यानंतरही त्याचा काही परिणाम बाळावर दिसून येत नव्हता; अखेर उरुळी कांचनचे उपसरपंच रामदास तुपे, संदीप कांचन, भैलिमकर पैलवान यांनी तातडीने निर्णय घेत हे बाळ व बाळाच्या आईस पुणे येथील ससून रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले. ससून मधील डॉ. बडदरे, जया मॅडम यांना उपचराबांबत सर्व गोष्टींची माहिती दिली. त्यानंतर डॉक्‍टरांनी अनुभव पणाला लावून बाळावर यशस्वी उपचार केले. विशेष म्हणजे याकरिता काही केसपेपरचा खर्च वगळता कोणताही वाढीव खर्च आकारण्यात आला नाही. उपचारानंतर बाळ व बाळाच्या आईस रितसर घरी सोडण्यात आले. मोठा खर्च करूनही बाळाच्या जीवाचा धोका टळत नव्हता अशा वेळी शासकीय म्हणून कमी लेखले जात असलेल्या ससून रूग्यालयानेच मदतीचा हात दिला. आता, बाळ आणि त्याची आई सुखरूप झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी ससून रूग्णालय प्रशासाचे आभार मानले.

यावेळी ससून रूग्णालयातील डॉक्‍टराचाही सन्मानही करण्यात आला. संदिप कांचन यांनीही ससून रूग्णालय व्यवस्थापनाचे आभार मानले. यावेळी उपसरपंच रामदास तुपे म्हणाले की, आपण खासगी रूग्णालयात लाखो रूपये खर्च करतो, तेथे मोठ्या प्रमाणात खर्च होऊनही निराशाच पदरी पडते. परंतु, ससून सारख्या शासकीय रूग्णालयाने विश्‍वास जपला आहे. गोरगरीबांची सेवा येथे मोफत असली तरी त्यांना रूग्याच्या जीवाची किंमत माहित आहे, यामुळेच शासकीय रूग्णालय म्हणून ससून बाबत कोणतीही शंका न बागळता येथे उपचारास प्राधान्य द्यावे, असे तुपे यांनी सांगितले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)