ससूनमध्ये आईने मुलाला मुत्रपिंडदान करून दिले जीवनदान

पुणे- जन्मतःच एकच मुत्रपिंड असलेल्या व सात वर्षापासून मूत्रपिंडाबाबतच्या आजाराने त्रस्त असणाऱ्या तरुणावर गुरवारी 9 ऑगस्ट रोजी ससून रुग्णालयात मूत्रपिंडाची यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली. मूत्रपिंड विकारग्रस्त झाल्यामुळे 27 वर्षीय मुलाच्या जीवावर बेतलेल्या संकटातून त्याला वाचविण्यासाठी त्याच्या आईने मूत्रपिंड दान केले.
हडपसर येथील महम्मद वाडी येथे राहणाऱ्या फल्ले कुंटुबातील हा मुलगा आहे. वडील सुरक्षा रक्षक म्हणून साळुंके विहार येथे काम करतात. आई गृहिणी आहे. यांना दोन अपत्य असून दोन्ही दहावीपर्यंत शिकलेली आहेत. वडिलांचे वय 53 वर्षे तर आईचा वय 45 वर्षे, थोरला मुलगा मयूर 7 वर्षांपासून किडनी विकाराने त्रस्त होता. त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते. रुग्णालयीन खर्च परवडत नसल्यामुळे ससून रुग्णालयाकडे धाव घेतली. ससूनमध्ये सहा महिन्यांपासून डायलिसिस उपचार होते. ससूनच्या तज्ञ्‌ डॉक्‍टरांनी मूत्रपिंड प्रत्यारोपणाचा सल्ला त्याला दिला होता. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची होती. रुग्ण गरजू होता, म्हणून महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून ही शस्त्रक्रिया करण्यात आली. ससूनचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांनी सांगितले की, हे जिवंत दाता असलेले चौथे मूत्रपिंड प्रत्यारोपण आहे तर ससूनमधले एकूण आठवे आहे. या प्रत्यारोपण शस्त्रक्रिया पथकात डॉ. सुरेश पाटणकर, डॉ.अभय सदरे, डॉ. धनेश कामेरकर, डॉ. सुरेखा शिंदे, डॉ. योगेश गवळी यांचा या पथकात समावेश होता.

अजून 16 रुग्ण ससूनच्या मूत्रपिंड प्रत्यारोपनाच्या प्रतीक्षा यादीवर आहेत आणि यकृत प्रत्यारोपणसाठी 3 रुग्ण नोंदणी झालेले आहेत. दानशूर व्यक्ती व सेवाभावी संस्था यांनी देणगीच्या माध्यमातून पुढाकार घ्यावा ज्यामुळे प्रत्यारोपणचा खर्च न परवडणारी कुटुंबे सुद्धा प्रत्यारोपणचा पर्याय स्वीकारतील . ससूनला दिलेल्या देणगीवर 80 जी ची सुविधा उपलब्ध आहे.
डॉ.अजय चंदनवाले, अधिष्ठाता
ससून रुग्णालय


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)