ससूनमध्ये अत्याधुनिक मोबाईल ब्लड कलेक्‍शन व्हॅन

अत्याधुनिक यंत्रणेने सुसज्ज, रक्तसंचलनाची क्षमता वाढणार

पुणे – अत्याधुनिक यंत्रणेने सुसज्ज, वातानुकुलीत, त्याचबरोबर दोनशे रक्त पिशव्या साठवण्याची क्षमता असलेली अत्याधुनिक मोबाईल ब्लड कलेक्‍शन व्हॅन ससून रुग्णालयात दाखल झाली असुन यामुळे रक्तपेढी अधिक कार्यक्षम होऊन रक्ताअभावी रुग्णांचे प्राण वाचविण्यास मदत होणार आहे. यामुळे राज्यभरात असलेल्या शासकिय वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालयातील ससून या एकमेव रुग्णालयातअशा प्रकारची मोबाईल व्हॅन उपलब्ध झाली आहे.
रोटरी क्‍लब ऑफ पुणे तर्फे अभय गाडगीळ यांच्या हस्ते रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांच्या हाती ही व्हॅन सुपुर्द करण्यात आली. यावेळी डॉ. मुरलीधर तांबे, डॉ. रमेश भोसले, डॉ. शैला पुराणीक, डॉ. सोमनाथ सलगर, डॉ. मंगेश सगळे आदी उपस्थित होते.

ससून सर्वोपचार रुग्णालयात 2017 साली रक्तपेढीतर्फे सुमारे 187 रक्तदान शिबीरे घेण्यात आली असुन त्यामधुन जवळपास 14 हजार 502 युनिटचे रक्त संकलन करण्यात आले आहे. रुग्णालयातर्फे विविध ठिकाणी रक्तदान शिबीरे राबवली जातात. यामधुन रक्त संचलन करुन ते गरजूंना पुरविले जाते. रुग्णालयात नव्याने दाखल झालेली व्हॅन ही संपुर्ण वातानुकुलीत असुन एकाच वेळी दोन रक्तदात्यांचे रक्त घेऊ शकते. त्याचबरोबर व्हॅनमध्ये मोठ्या प्रमाणात रक्त साठविण्याची क्षमता असुन ते साठवुन ठेवण्यासाठी शीतसाखळी मेन्टेन करण्याची सुविधा आहे. रक्तदात्याच्या रक्तदानानंतर व्हॅनमध्ये घरगुती फ्रिजची व्यवस्था आहे.

-Ads-

त्याचबरोबर व्हॅनमध्ये रक्तदात्यांसाठी स्वच्छतेच्या दृष्टीकोनातुन वॉशबेसीन, केमिकल टॉयलेट, शॉवर आदींची सोय करण्यात आली आहे. याविषयी बोलताना डॉ. चंदनवाले म्हणाले, नव्याने उपलब्ध झालेल्या या फिरत्या वातानुकुलीत व्हॅनमुळे रक्तपेढी अधिक सुसज्ज होऊन रक्त संचलनाची क्षमता वाढेल. रक्तदान शिबीराच्या माध्यमातून 2018 या वर्षी 24 हजार युनिट रक्त संकलन करण्याचे उद्दीष्ट असुन ते गरंजुसाठी उपलब्ध करुन दिले जाईल.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)