ससूनमधील आरोग्य सेवा सुरळीत रहाणार – डॉ.चंदनवाले

पुणे,दि.8 – सरकारी कर्मचाऱ्यांचा राज्यात सर्वत्र सध्या संप सुरु आहे. मात्र असे असले तरीही ससून सर्वोपचार रुग्णालयाच्या सेवेवर याचा कोणताही परिणाम झालेला नसून सेवा गुरुवारी सुरळीत सुरु रहाणार असल्याचे रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.अजय चंदनवाले यांनी सांगितले.
सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपात मुंबईच्या जेजे रुग्णालय व घाटी रुग्णालयातील परिचारिका संपावर गेले आहेत. मात्र ससूनमध्ये याआधीपासूनच कर्मचाऱ्यांनाही अत्यावश्‍यक सेवा कायदा लागू असल्याने कर्मचारी संपावर जाऊच शकणार नाही. दरम्यान ससूनमधील शंभर टक्‍के कर्मचारी गुरुवारी कामावर असून संपाचा कोणताही परिणाम आरोग्य सेवेवर होऊ देणार नाही असे डॉ.चंदनवाले यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)