ससूनच्या नव्या इमारतीसंबंधी खासदार अनिल शिरोळे यांनी घेतली महाजनांची भेट

पुणे – ससून रुग्णालयाची सध्या नवी इमारत उभी रहात असून त्यांचे बांधकाम गेल्या काही वर्षापासून सुरु आहे. हे बांधकाम लवकरात लवकर पूर्ण होण्याच्या दृष्टीकोनातून खासदार अनिल शिरोळे यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांची नुकतीच भेट घेतली. सद्यस्थितीत 109.85 कोटी प्रशासकीय मान्यतेंर्गत 65.12 कोटी रुपयाची निविदा काढण्यात आली असून ती शासन स्तरावर सचिवांकडे आहे. तर उर्वरित 55.07 कोटी रुपयांची अंदाजपत्रक शासनास सादर केले आहे. यासाठी प्रशासकीय मान्यता लवकरात लवकर मिळणे गरजेचे आहे. यासाठी खासदार शिरोळे यांनी महाजन यांची भेट घेऊन शासकीय परवानग्या लवकरात लवकर मार्गी लावून ससूनच्या नव्या इमारतीचे काम लवकर पूर्ण करावे अशी मागणी केली आहे.
——————-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)