ससूनची 26 डॉक्‍टरांची टीम केरळच्या मदतीला

पुणे – केरळमधील पूरपीडितांच्या मदतीसाठी देशभरातून मदतीचा ओघ सुरू झाला आहे. यात काही दिवसांपूर्वी पुण्यातून पिण्याचे पाणी पाठविण्यात आले. आता तेथील नागरिकांच्या आरोग्य तपासणीसाठी ससून रुग्णालयाचे 26 डॉक्‍टर्स नुकतेच रवाना झाले आहेत.

वैद्यकीय शिक्षण व संशोधन मंत्री गिरीश महाजन यांच्यासह महाराष्ट्र शासनाच्या पथकात 26 डॉक्‍टर्स केरळला पूरग्रस्तांच्या आरोग्य सेवेसाठी रवाना झाले. तेथील नागरिकांची आरोग्य तपासणी व औषधोपचार ही टीम करणार आहे. यामध्ये मेडिसीन, पेडियाट्रिक, गायनॉकॉलॉजिस्ट, प्रिव्हेंटिव्ह अँड सोशल मेडिसीन या विभागाचे तज्ज्ञ डॉक्‍टर्स आहेत, अशी माहिती ससूनचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांनी दिली. पुढील एक आठवडा हे डॉक्‍टर्स पूरग्रस्तांच्या आरोग्याची देखभाल करणार आहेत. यासाठी काही औषधसाठादेखील पुरविण्यात आला आहे.

-Ads-

रेल्वेनेही पाठविला रेक
केरळमधील महापुरात अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी वापर व्हावा यासाठी सोमवारी मध्यरात्री 3 वाजता पुणे स्टेशनवरून एक रिकामा रेक पाठवण्यात आला आहे. हा रेक केरळमधील तिरुवनंतपुरम्‌ येथे पाठविण्यात आला आहे हा रेक 18 कोचचा असून तो दक्षिण रेल्वेसाठी उपयुक्त ठरेल, असा आशावाद वरिष्ठ वाणिज्य प्रबंधक कृष्णाथ पाटील यांनी व्यक्‍त केला आहे. केरळवासियांसाठी मोफत मालवाहतूक (रिलीफ मटेरियल) सुरू केली असून सविस्तर माहितीसाठी 9766-353-772 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन रेल्वेने केले आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)