सव्वा लाखाच्या धान्याची चोरी

कराड, दि. 21 (प्रतिनिधी ) – येथील दत्त चौकातील हेमंत ट्रेडिंग कंपनी या धान्य विक्री दुकानच्या गोडावूनची खिडकी तोडून 8 ते 10 अनोळखी महिलांनी सुमारे सव्वा लाख रुपये किंमतीचे धान्य लंपास केल्याची फिर्याद हेमंत ठक्‍कर यांनी शहर पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यावरुन अनोळखी महिलांवर गुन्हा नोंद झाला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, फिर्यादी हेमंत ठक्कर यांच्या मालकीचे हेमंत ट्रेडिंग कंपनी नावाचे धान्य विक्रीचे दुकान दत्त चौकातील सूर्या कॉम्पेलक्‍समध्ये आहे. दुकानाची जागा अपुरी असल्याने धान्य ठेवण्यासाठी मार्केट यार्ड येथे गोडावून घेतले आहे. दि. 18 ऑगस्ट रोजी सायंकाळी हेमंत ठक्कर हे सहज गोडावूनकडे गेले होते. त्यावेळी गोडवूनच्या पाठीमागील बाजूला काही महिला संशयास्पदरित्या फिरत असल्याचे त्यांना दिसले. मात्र, त्यांनी त्याकडे गांभिर्याने लक्ष दिले नाही. त्यानंतर मंगळवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास ठक्कर गोडवूनकडे गेले. त्यावेळी त्यांना पाहून गोडवूनच्या पाठीमागील बाजूने 8 ते 10 महिला पळून गेल्या. ठक्कर यांना संशय आल्याने पुढे जाऊन पाहिले असता गोडावूनची पाठीमागील खिडकी उघडी असल्याचे त्यांच्या निर्दशनास आले.

तसेच खडकीचे गजही काढल्याचे दिसले. गोडावूनचा समोरील दरवाजा उघडून आत जाऊन पाहिले असता गोडावूनमधील तांदळाचे 25 किलो वजनाचे दहा कट्टे व गव्हाचे 30 किलो वजनाचे 10 कट्टे, असे एकूण सुमारे 1 लाख 23 हजार रुपये किंमतीचे 95 कट्टे चोरीस गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. तसेच गोडवूनमध्ये ठेवलेली 2 हजार रुपये किंमतीची ऍल्युमिनीयमची शिडीही चोरून नेण्यात आली होती. गोडावूनच्या पाठीमागील बाजूने पळून गेलेल्या महिलांनीच ही चोरी केल्याची त्यांची खात्री झाल्यानंतर ठक्‍कर यांनी 8 ते 10 अनोळखी महिलांविरोधात शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरुन गुन्हा नोंद झाला आहे. उपनिरीक्षक शिवराम खाडे तपास करत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)