सव्वा दोन लाखाची घरफोडी

कोंढवा येथे सव्वा दोन लाखाची घरफोडी करण्यात आली. याप्रकरणी कोंढवा पोलीसांत अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी विजया गोपाल(61,रा.कोंढवा) या एनआयबीएम रस्त्यावरील कुबेर गार्डन सोसायटीमध्ये रहातात. त्यांची सदनिका बंद असताना चोरट्याने मुख्य दरवाजाचे कुलूप उघडून आत प्रवेश केला. यानंतर बेडरुमच्या कपाटातील सोन्या-हिऱ्याचे दागिने असा 2 लाख 14 हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक शिंदे तपास करत आहेत.
—————————–
मोबाईल टॉवर बसविण्याच्या बहाण्याने साडेचार लाखाची फसवणूक
पुणे,दि.28(प्रतिनिधी)-मोबाईल टॉवर बसवून त्या बदल्यात दरमहा 85 ते 90 हजाराचे भाडे देण्याचे आमिष दाखवून एका महिलेची 4 लाख 37 हजार 450 रुपयांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी अज्ञात मोबाईल धारक व्यक्ती व महिलेविरुध्द खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी कुमुदनी कुरापट्टी(55,रा.गंज पेठ) यांनी एका जाहीरात वाचून त्यावरील क्रमांकावर कॉल केला होता. तेव्हा समोरच्या व्यक्तीने त्यांच्या दौंण्ड तालूक्‍यातील जागेवर मोबाईल टॉवर बसवून देण्याचे आश्‍वासन दिले. यानंतर त्याबदल्यात कंपनीकडून त्यांना दरमहा 85 हाजर ते 90 हजार रुपये भाडे व 20 वर्षापासाठी 85 लाख डिपॉझिट देण्याचे आमिष दाखवले. यानंतर त्यांच्याकडून वेगवेगळ्या कारणासाठी 4 लाख 37 हजार 450 रुपये बॅंकेच्या खात्यावर भरण्यास सांगितले. मात्र यानंतरही त्यांना मोबाईल टॉवर न देता फसवणूक करण्यात आली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)