सव्वाशे कोटी कुटुंबांनी गॅस सबसिडी सोडल्याचा पंतप्रधानांचा दावा

नवी दिल्ली : लाल किल्ल्यावरून गॅस सबसिडी सोडण्याचे आवाहन केल्यावर सव्वाशे कोटी कुटुंबांनी सबसिडी सोडल्याचा अजब दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणात केला आहे.

दिल्लीत एम्सच्या चार नव्या प्रकल्पांचे उद्घाटन मोदींच्या हस्ते झाले. त्यावेळी केलेल्या भाषणात मोदी बोलत होते. सव्वाशे कोटी लोकसंख्या असलेल्या देशात सव्वाशे कोटी कुटुंबे असतीलच कशी, अशी चर्चा आता सुरू झाली आहे. बोलण्याच्या ओघात अनावधाने हा उल्लेख झाला असण्याची शक्यता असली तरी मोदींच्या या विधानामुळे विरोधकांना आयते कोलित मिळण्याची शक्यता आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)