सव्वालाख पुणेकर “आयुष्यमान’

योजनेत समावेश, पण शहरी गरीब योजनेला मुकणार

पुणे – आर्थिक दुर्बल घटकांमधील नागरिकांना सर्व प्रकारच्या आजारांसाठी केंद्रशासनाकडून आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत प्रत्येकी 5 लाखांपर्यंतच्या वैद्यकीय उपचाराचा खर्च दिला जाणार आहे. या योजनेत पुणे शहरातील सुमारे 1 लाख 31 हजार कुटुंबाचा समावेश आहे.

-Ads-

आयुष्यमान भारत योजने अंतर्गत केंद्र शासन शहरातील रुग्णालयांशी करार करणार असून त्यामध्ये या कुटुंबांना उपचार घेता येणार आहेत. दरम्यान, या योजनेत उपचार घेणाऱ्या नागरिकांना महापालिकेच्या शहरी गरीब योजना तसेच राज्य शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजनेचा लाभ मिळणार नसल्याचे महापालिकेच्या आरोग्य विभागाचे प्रमुख डॉ. रामचंद्र हंकारे यांनी सांगितले.

केंद्र शासनाने केलेल्या सामाजिक आणि आर्थिक सर्वेक्षणात एक लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असलेली सुमारे 1 लाख 31 हजार कुटुंबे आढळून आली आहेत. या सर्वेक्षणाच्या माहितीच्या आधारे केंद्र शासनाने या कुटुंबाची यादी महापालिकेस दिले आहे. त्यानुसार, या योजनेतील लाभार्थ्यांना महापालिकेच्या माध्यमातून केंद्रशासन शहरात निश्‍चित करुन देणाऱ्या रुग्णालयात उपचार दिले जाणार आहेत. त्यासाठी रुग्णालयाची यादी अजून अंतिम झालेली नाही. त्यामुळे महापालिकेकडे केवळ लाभार्थ्यांची यादी असली तरी, प्रत्यक्षात रुग्णालये निश्‍चित झालेली नसल्याने अजून शहरातील कोणत्याही नागरिकांना या योजनेचा अजून लाभ मिळालेला नसल्याचे आरोग्य विभागाने सांगितले. तसेच या यादीत असलेल्या लाभार्थींची यादी केंद्रशासनाने निश्‍चित केलेली असल्याने त्यात वाढ करण्याचा अथवा नाव कमी करण्याचा कोणताही अधिकार महापालिका तसेच राज्यशासनास नाहीत. त्यामुळे केंद्राने पाठविलेली यादीच अंतिम राहणार असल्याचे डॉ. हंकारे यांनी स्पष्ट केले.

…म्हणून मिळणार नाही लाभ
महापालिकेकडूनही शहरात 8 वर्षांपासून शहरी गरीब योजना राबविण्यात येत आहे. या योजनेत महापालिकेकडून आर्थिक दुर्बल घटकांमधील नागरिकांना 1 लाख रुपयांपर्यत वैद्यकीय उपचारांची मदत दिली जात होती. यात यावर्षी वाढ करण्यात आली असून ही मदत 2 लाख रुपये करण्यात आली आहे. यातून सुमारे 9 हजार नागरिकांनी या योजनेचा लाभ घेतलेला असून त्यांच्यावर आतापर्यंत सुमारे 10 कोटी रुपयांचा खर्च झालेला आहे. मात्र, केंद्राच्या आयुष्यमान भारत योजनेचा लाभ घेणाऱ्या नागरिकांना या योजनेचा लाभ घेता येणार नसल्याचे सांगण्यात आले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)