सव्वादोन लाखांचे रंगाचे डबे चोरऱ्यास कोठडी

लोणी काळभोर- घरांच्या रंगकामासाठी वापरण्यात येणाऱ्या रंगांची विक्री करणाऱ्या दुकानाच्या गोदामातून तब्बल सव्वादोन लाख रुपयांचे रंगाचे डबे चोरल्या प्रकरणी त्याच दुकानात काम करणाऱ्या कामगारास पोलिसांनी अटक केली आहे. त्याला दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. प्रणेश संजय मिसाळ (रा. मुळ उन्हावरे, पो. वावघर, ता. दापोली, जि. रत्नागिरी) असे कोठडी सुनावलेल्याचे नाव आहे. तर सुनिल मुरलीधर काळभोर (रा. पांढरी मळा, लोणी काळभोर, ता. हवेली) या दुकान मालकाने फिर्याद दिली आहे. सुनिल काळभोर यांचे लोणी स्टेशन येथे दुकान व गोदाम आहे. या गोदामाच्या वरच्या मजल्यावरील खोलीत प्रणेश मिसाळ राहत होता. फेब्रुवारी ते डिसेंबर 2018 या कालावधीत प्रणेश मिसाळ याने या गोदामातील विविध आकाराचे, विविध कंपन्यांचे 2 लाख 29 हजार 230 रुपयांचे रंगाचे डबे चोरून नेले होते. याप्रकरणी काळभोर यांनी तक्रार दाखल केली होती. पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक श्रीकांत इंगवले, हवालदार महेंद्र लोहार यांनी तपास करीत प्रणेशला त्याच्या मुळ गावातून जेरबंद केले. पुढील तपास महेंद्र लोहार करत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)