सव्वाचार किलो गांजा जप्त

पिंपरी – विक्री करण्यासाठी आणलेला 4 किलो 365 ग्रॅम वजनाचा 64 हजार रुपयांचा गांजा जप्त करत वाकड पोलिसांनी एका वृध्दाला अटक केली आहे. ही कारवाई बुधवारी (दि. 1) रात्री काळाखडक येथील चंद्रमाऊली गार्डन समोर करण्यात आली.

चंदू प्यारअप्पा पुजारी (वय-60, रा. काळाखडक झोपडपट्टी, वाकड) असे अटक करण्यात आलेल्या वृध्दाचे नाव आहे.

वाकड पोलिसांना काळाखडक येथे एक इसम गांजा विकत असल्याची माहिती खबऱ्या मार्फत मिळाली. यावर पोलिसांनी सापळा रचून काळाखडक येथील चंद्रमाऊली गार्डन समोरून चंदू याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्या जवळील पिशवीमध्ये तब्बल 4 किलो 365 ग्रॅम वजनाचा 64 हजार रुपयांचा गांजा आढळून आला. पोलिसांनी चंदू याला अटक केली आहे. वाकड पोलीस अधिक तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)